सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- नुकताच सिने-नाट्य सांस्कृतिक गुढी चा पहिलावहिला कलावंत मेळावा राशी स्टुडिओ, माने वखार, करीरोड, मुंबई 12. या ठिकाणी प्र सिद्ध सिने-नाट्य कलावंत, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, निर्माते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
  • हा मेळावा एकत्रितरीत्या साजरा करण्यामागे उद्देश एवढा च होता कीं तळागाळातील सर्व कलावंतांनी एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा शिवाय एकमेकांच्या भेटीगाठी होऊन कामा संदर्भात चर्चा होईल आणि प्रत्येक कलावंताला त्याच्या हाताला काम मिळेल.
  • या मेळाव्याचे आयोजन सर्वश्री दिलीप दळवी, डॉ.किशोर खुशाले, अनिल सुतार, महेश्वर तेटांबे, शीतल माने-शेळके आणि सिद्धी कामथ यांनी केले.
  • याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन महाराष्ट्र बाजारपेठ चे सं स्थापक,अध्यक्ष डॉ.कौतिक दांडगे, प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सदानंद राणे, प्रसिद्ध हास्य अभिनेते कांचन पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
  • या मेळाव्यात अनेक कलावंतांनी सहभाग घेऊन आपली कला सादर केली त्यात प्रामुख्याने लावणी नृत्य, एकपात्री अभिनय, नाट्य प्रवेश, कराओके गायन आणि खास करू न प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांनी स्व.शाहीर दा दा कोंडके यांच्या गीतांवर केलेलं नृत्य आणि प्रसिद्ध वाद क कलावंत डॉ.किशोर खुशाले यांनी काही निवडक वाद्यां ची माहिती आपल्या कल्पकतेने मांडून रसिकांची वाहवा मिळवली.
  • प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ यांनी या संपूर्ण कार्यक्रमा चं सूत्रसंचालन आपल्या मधाळ आणि रसाळ वाणीने क रून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आणि महेश्वर भिका जी तेटांबे यांनी जमलेल्या सर्व कलावंत, अतिथी यांचे आभार मानले.
  • हा पहिलावहिला कलावंत यशस्वी करण्यासाठी सिद्धी कामथ आणि शीतल माने-शेळके यांनी विशेष मेहनत घेतली.
  • त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी सर्वश्री.अरविंद घेवडे, प्रमो द मोहिते, आबा पेडणेकर, शंकर पिसाळ, अविनाश राऊ त, उदय साटम यांनी सर्वतोपरी सहकार्य केलं.
  • अशा तऱ्हेने कलावंतांच्या उत्साहात पहिलावहिला कला वंत मेळावा जोशात आणि दिमाखात संपन्न झाला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

 

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles