
परंडा पालिकेकडून दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधीचे वाटप, ३ लाख ७४ हजारांचा लाभ….! तानाजी घोडके यांच्या पाठपुराव्याला यश ; लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा नगरपालिके च्या वतीने दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत राखीव असले ल्या ५ टक्के निधीचे यशस्वीरीत्या वाटप करण्यात आले.
- शहरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एकूण ३ लाख ७४ हजार ४०० रुपयांच्या निधीचा लाभ देण्यात आला असून, यामुळे दिव्यांग बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

- नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली आणि नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
- शहरातील दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सहाय्य क साहित्य, उपजीविकेची साधने आणि इतर अत्यावश्य क बाबींसाठी ही आर्थिक मदत थेट वितरित करण्यात आली.
- या निधीसाठी ‘दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य’चे अ ध्यक्ष तानाजी घोडके यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपु रावा केला होता.
- त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने शहरातील दिव्यांग बां धवांनी समाधान व्यक्त केले आहे. दिव्यांगांच्या सक्षमीकर णासाठी नगरपालिकेने उचललेले हे पाऊल अत्यंत मह त्त्वाचे मानले जात आहे.

- या निधी वाटप कार्यक्रमाप्रसंगी नगरपालिकेचे संबंधित अ धिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या सखेने उपस्थित होते.
- प्रशासनाने भविष्यातही अशाच प्रकारे दिव्यांगांच्या विका साला आणि कल्याणाला प्राधान्य देण्याचे संकेत दिले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






