
सपरंडा शहरात धाडसी चोरी: स्वामी समर्थ नगरमध्ये बंद घर फोडून १५ तोळे सोन्यासह रोकड लंपास.
- प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा शहरातील स्वामी सम र्थ नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे.
- या घटनेत चोरट्यांनी सुमारे १५ तोळे सोने आणि ८० ह जार रुपयांची रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
- आजारी आईला भेटायला गेले अन् घर लुटले मिळालेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी शीतल मधुकर (उर्फ नाना) झमदाडे यांची आई आजारी असल्या ने त्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- आईची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत राह ण्यासाठी झमदाडे कुटुंब घराला कुलूप लावून बार्शीला गेले होते.
- घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली. कपाटा चे लॉक तोडून मुद्देमाल लंपास चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
- घरातील कपाटाचे लॉक आणि त्यानंतर लॉकरचे कुलूप तोडून आतील १५ तोळे सोन्याचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले.
- झमदाडे कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला आणि चोरी झाल्याचे उघडकीस आले.
- पोलीस तपास आणि श्वान पथक पाचारण या घटनेची मा हिती मिळताच नाना झमदाडे यांनी तत्काळ परंडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

- परंडा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. तपासाला गती देण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. ठसे तज्ज्ञांच्या मदतीने आ णि श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सध्या सुरू आहे.
- याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची मा गणी नागरिकांकडून केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






