
तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करा; दिव्यांग उद्योग समूहाचे वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- आपल्या शिस्तबद्ध आणि पारदर्शक कामकाजासाठी प्रसिद्ध असलेले प्रामा णिक अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच झालेली बद ली तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूह, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.
- मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेच्या हिता चे निर्णय घेऊन प्रशासनात एक प्रकारची शिस्त आणली होती.

- त्यांच्या अशा धडाडीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरि कांचा प्रशासनावरील विश्वास वाढला आहे.
- मात्र, त्यांची अचानक बदली केल्यामुळे सुरू असलेल्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता असून प्रशास नावरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- दिव्यांग उद्योग समूहाने आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, समाजातील वंचित आणि दिव्यांग घटकांच्या प्र श्नांची जाण असणारे व नियमांची काटेकोर अंमलबजाव णी करणारे अधिकारी पदावर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
- त्यामुळे शासनाने जनभावनेचा विचार करून या बदली च्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.

- हे निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके, महिला जिल्हाध्यक्ष उषा भास्कर पाटील, तालुकाध्यक्ष तानाजी सांगडे, रावसाहेब खरसडे, दादा मा ने, गणेश जाधव, करीम मुलानी, उत्तरेश्वर जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






