पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त…?
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- वार्ताहर : मुंजाभाऊ घायतिडक :- वाढत्या इंधन दरामुळे सामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.
- परंतु, मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकार पुन्हा एकदा इंधनाच्या किमतींवरील कर कमी करण्याच्या तयारीत आहे.
- महागाईचा दर कमी करण्यासाठी भारत सरकार इंधन आणि इतर काही गोष्टींवरील कर कमी करू शकते, अशे निर्णय घेतल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात.
- असे झाले तर सामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळणार आहे.
- रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीच्या महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
- भारताचा वार्षिक किरकोळ चलनवाढीचा दर ५.७२ टक्क्यांवरून ६.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पुन्हा इंधनावरील कर कमी करू शकते, त्यासोबतच आयात शुल्कही कमी करू शकते.
- असे झाले तर महागाई कमी होण्यास मदत होईल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space