
पाचपिंपळा येथे वीज सुविधांच्या कामांना वेग; १० MVA ट्रान्सफॉर्मरचे काम युद्धपातळीवर.
- प्रतिनिधी : फारूक शेख :-उपअभियंत्यांच्या सूचनेनंतर खराब साहित्य बदलण्यास सुरुवात; ग्रामस्थांकडून कामा ची पाहणी पाचपिंपळा:शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वीज प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मौजे पाच पिंपळा येथील ३३ केव्ही सबस्टेशनवर १० MVA क्षम तेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सध्या युद्धपात ळीवर सुरू आहे.

- या कामामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम हो णार असून, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या कामाची पाहणी केली.
- पाचपिंपळा सबस्टेशन अंतर्गत जुन्या आणि खराब झाले ल्या साहित्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित (ट्रिपिंग) होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
- या समस्येची दखल घेत ग्रामस्थांनी एमएसईबी परांडा वि भागाचे उपअभियंता माननीय पवार साहेब यांची भेट घेऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
- पवार साहेब यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, सबस्टे शनमधील सर्व खराब साहित्य त्वरित बदलण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
- नवीन १० MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर आ णि खराब साहित्य बदलल्यानंतर पाचपिंपळा परिसराती ल वीजपुरवठा विनाव्यत्यय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
- ग्रामस्थांनी सुरू असलेल्या कामाचा दर्जा तपासला असू न, काम उच्च दर्जाचे करण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत.

- यावेळी नारायण खैरे,किरण खैरे, इम्रान बागवान, पै.शंकर खैरे, ऑपरेटर दिनेश सांगडे, शिंदे साहेब, लाईनमन राहुल बनसोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






