नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पोषण आहाराचा छुपा खजिना भारताकडे – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पोषण आहाराचा छुपा खजिना भारताकडे

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर : ईरफान शेख :- नागपूर : मनुष्याला जडणाऱ्या ८० टक्के आजारांचे मूळ हे आहारात दडल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
  • मात्र, मानवी शरिराला पोषक ठरणाऱ्या पोषण आहाराची क्षमता भरडधान्यात आहे, हे देखील जगाने मान्य केले असून जगाला जे भरडधान्य पुरविले जाते, त्यात भारताचा वाटा २० टक्के आहे.
  • जगाला पोषण आहार पुरविणाऱ्या भारताकडे छुपा खजिना दडला आहे, असा सूर श्री अन्न अधिवेशनात उमटला.
  • विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या रसायनशास्त्र इंजीनिअरिंग विभाग आणि राष्ट्रीय महिला, बाल आणि युवा विकास विभागाच्या वतीने व्हीएनआयटीच्या प्रांगणात आयोजित श्री अन्न अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • भरडधान्याच्या बाबतीत भारताच्या क्षमतेवर प्रकाश टाकताना डॉ. वाघमारे म्हणाले, देशातील ३७५ लाख हेक्टर क्षेत्रफळावर भरडधान्याचे उत्पादन घेतले जाते. जगामध्ये यात भारताचा सर्वाधिक २० टक्के वाटा आहे.
  • केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याने आपण येत्या २० वर्षांत जगाला पोषणयुक्त भरडधान्य पुरविणारा कोठार असलेला देश बनवू शकतो. डॉ. पडोळे म्हणाले, शिक्षित अशिक्षित ही व्याख्या पुस्तकी ज्ञानावर ठरत नसते तर ती जमिनीशी असलेल्या नात्यावरून ठरते.
  • परंपरागत शेतीला सोशल इंजीनिअरिंगची जोड देणे ही काळाची गरज आहे. पिकांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना वाढीस लावण्यासाठी वेगवेगळ्या शाखेतील तरुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
  • भरडधान्य शास्त्रज्ञ डॉ. चापके म्हणाले, शरिराचे संपूर्ण पोषण करण्याची क्षमता भरडधान्यातच आहे. भरडधान्याची चव तरुणांच्या जिभेवर रुजविण्याचे काम गृहिणींनी केले पाहिजे.
  • तरच पिढी सुदृढ आणि निरोगी होईल. डॉ इप्सिता चक्रवर्ती यांनी सूत्रसंचालन केले तर रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनुपमा कुमार यांनी आभार मानले.
  • केंद्र सरकारकडून सप्तसूत्री कार्यक्रम
  • भरडधान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने सप्तसूत्री मिशन हाती घेतल्याचे सांगत मालविय म्हणाले, भरडधान्याच्या देशी वाणांचे संशोधन, लूप्त होणारे भरडधान्य संवर्धन, बीज बँक, वितरण साखळी, मार्केटिंग, दलाल साखळी खंडीत करणे, स्टार्टअपला प्रोत्साहन हा सप्तसूत्री मिशनचा धागा आहे. या माध्यमातून देशभर भरडधान्य बीज बँक साखळी तयार केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा