नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , शेअर बाजारात घसरण,सेन्सेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडला – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

शेअर बाजारात घसरण,सेन्सेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • रिपोर्टर : नितीन राने :- शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 340 अंकांनी तर निफ्टी 92 अंकांनी गडगडला.
  •  सेन्सेक्ससह निफ्टीची घसरण 
  • आज सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात सेन्सेक्स 340.89 अंकांनी घसरून 60,978.62 अंकांच्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे.
  • दुसरीकडे, निफ्टी 92.20 अंकांनी घसरला असून 17,943.65 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.
  • गुरुवारी सेन्सेक्स 44 अंकांच्या किंचित वाढीसह 61,319 अंकांवर बंद झाला. बँकिंग आणि फायनॅन्स सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली.
  • Share Market Opening Bell : काय आहे बाजारातील परिस्थिती?
  • आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल, गॅस, फार्मा, ऑटो क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
  • तर धातू, ऊर्जा, मीडिया, इन्फ्रा सेक्टरमधील शेअर्स तेजीत आहे. मिडकॅप्समध्ये घसरण होत आहे मात्र, स्मॉल कॅप शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत.
  • सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 9 शेअर्सची घोडदौड सुरु आहे तर 21 शेअर्स घसरले आहेत. याउलट निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 17 शेअर्स वाढीसह तर 33 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
  • आज सुरुवातीच्या सत्रात निफ्टी आयटी 1 टक्क्यांनी आणि निफ्टी बँक 0.44 टक्क्यांनी घसरल्याचं दिसत आहे.
  • जागतिक बाजाराचा परिणाम
  • अमेरिकेतील व्याजदर वाढण्याच्या शक्यतेमुळे आशियाई बाजारांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे.
  • भारतीय बाजारात आयटी, फार्मा आणि पीएसयू बँकिंग सेक्टरचे शेअर्स घसरले आहेत. नेस्ले इंडियाचे शेअर्स 3.5 टक्क्यांच्या घसरणीसह निफ्टीच्या टॉप लूजर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
  • तसेच, अदानी एंटरप्रायझेस आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्स तेजीत व्यवहार करत आहे.
  • Share Market Top Gainers : ‘हे’ शेअर्स तेजीत
  • आजच्या शेअर बाजारात अल्ट्राटेक सिमेंट 2.73 टक्के, लार्सन 0.70 टक्के, टाटा स्टील 0.67 टक्के, HUL 0.39 टक्के, एशियन पेंट्स 0.33 टक्के, मारुती सुझुकी 0.25 टक्के, रिलायन्स 0.22 टक्के, भारती एअरटेल 0.17 टक्के आणि टाटा 0.70 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.
  • Share Market Top Losers : ‘हे’ शेअर्स गडगडले
  • आज सुरुवातीच्या सत्रात नेस्ले 2.43 टक्के, इंडसइंड बँक 1.25 टक्के, विप्रो 1.21 टक्के, एचसीएल टेक 1.03 टक्के, इन्फोसिस 0.91 टक्के, टीसीएल 0.90 टक्के, टेक महिंद्रा 0.89 टक्के, एचडीएफसी 0.09 टक्के तसेत सन फार्मा आणि एचडीएफसी बँक 0.57 टक्के घसरणीसह व्यवहार करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा