
सोनाली नर्सरी” च्या माध्यमातून वेगळा मार्ग निवडणारी पेंडखळेतील सोनाली संतोष जोगले.
- प्रतिनीधी : पेंडखळे : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्या तील मौजे पेंडखळे गावची सुपुत्री कु.सोनाली संतोष जोग ले हिने “सोनाली नर्सरी” हा छोटा व्यवसाय सुरु करत एक वेगळा मार्ग निवडला आहे.
- तरुण – तरुणी शिकल्यानंतर शक्यतो नोकरीसाठी पुणे मुं बई शहराकडे वळतात परंतु सोनालीच्या कुटुंबाकडे कोण तीही व्यवसायिक पार्श्वभूमी नसताना नितेश गराटे यांच्या कडून प्रेरणा घेऊन हा व्यवसाय सुरु केला.

- सोनाली हिचे बारावी पर्यंतचे शिक्षण राजापूरातील गोडे – दाते कनिष्ठ महाविद्यालयात झाले.
- ती मुंबईत गेली असती परंतु मूळ शेतीची आवड आणि गावातच राहून काहीतरी करायला हवे ही तळमळ तिला स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच गावातच राहून नर्सरी व्यवसाय सुरु केला.
- राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध युट्यूबर श्री सुनिल माळी यांच्या माध्यमातून सोनाली जोगले हिच्या पर्यंत पोहोचता आले.
- तिने यावेळी बोलताना तिच्यावर आलेल्या अनेक अडच णीचा इतिहास उलगडून दाखवला या अडचणींवर मात करत तिने आपली ही नर्सरी मोठ्या हिंमतीने सुरु ठेवली आहे.
- सोनालीचे आईवडील शेतकरी असून ही घरात मोठी आहे अख्ख्या घराची जबाबदारी तिने आपल्या खांद्यावर घेत ली आहे.
- खरेतर गावातच राहून व्यवसाय करण्यासाठी धडपडणा ऱ्या सोनाली सारख्या उदयोन्मुख व्यवसायिकेला आपण च प्रोत्साहन द्यायला हवे तालुक्यातील शेतकऱ्यांना या हं गामात लागवड करण्यासाठी जर काजूची रोपे हवी अस तील तर कु. सोनाली संतोष जोगले हिच्याशी ८०१०८३ ३५२४ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

- आपण सर्वांनी तिच्या नर्सरीतून काजू रोपे खरेदी केल्यास निश्चितच तिच्या व्यवसायाला हातभार लागेल त्यातूनच एक भविष्यात छोटी उद्योजिका निर्माण होऊ शकेल.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






