
किनवटचे प्रकल्प अधिकारी आता सांभाळणार गोंदिया जिल्हा परिषदेची धुरा; कनिष्ठ समय श्रेणीत पद अवनत करून शासनाचे आदेश जारी.
- प्रतिनीधी : प्रदीप वालदे :- सडक अर्जुनी ता.१७ जून) : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्याती ल आयएएस (भाप्रसे) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामध्ये किनवटचे प्रकल्प अधिकारी मा.झेनीथ चंद्र दोन्तुला (भाप्रसे) यांची महत्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी तातडीने बदली करण्या त आली आहे.

- शासनाच्या अधिकृत पत्रानुसार,भारतीय प्रशासकीय सेवा (सेवाभरती) नियम, १९५४ च्या नियम ६ ए (३) (ब) मधी ल तरतुदींचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
- सदर नियुक्ती करताना गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य का र्यकारी अधिकारी हे पद ‘कनिष्ठ समय श्रेणीत’ (Junior Time Scale) अवनत करून त्यावर मा. दोन्तुला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- मा. झेनीथ चंद्र दोन्तुला यांनी आपल्या सध्याच्या पदाचा (प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रक ल्प, किनवट तथा सहायक जिल्हाधिकारी, किनवट उप विभाग, नांदेड) कार्यभार विभागीय आयुक्त, छत्रपती सं भाजीनगर विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
- सामान्य प्रशासन विभागाचे सह सचिव सुभाष उमराणीक र यांच्या स्वाक्षरीने हा आदेश अधिकृतपणे जारी करण्यात आला असून, संबंधित विभागांना याविषयीच्या आवश्यक कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहेत.
- नवीन पदस्थापनेनंतर प्रशासनात गतिशीलता आणण्यासा ठी ई-ऑफिस व e-HRMS प्रणालीचा वापर वाढविण्या वर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
- संदर्भ: आदेश क्र. एईओ-११२६/५/२०२६/भाप्रसे-१, मंत्रालय, मुंबई.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






