
बावची विद्यालयात नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे व राहुल खताळ यांचा सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा पोलीस ठा ण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले श्री.गजानन शंकरराव मुळे यांची विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस उ पनिरीक्षक (पी.एस.आय.) पदावर निवड झाल्याबद्दल, बा वची विद्यालय येथे त्यांचा विद्यालयाच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.

- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.नारा यण खैरे होते. त्यांच्या हस्ते श्री.गजानन मुळे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
- आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य खैरे यांनी श्री.मुळे यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व मार्गदर्शक सेवाकार्याचा गौरव केला.

- मुळे यांनी खात्यात कार्यरत असताना प्रतिकूल परिस्थिती वर मात करत मिळवलेले हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणा दायी असल्याचे सांगत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभे च्छा दिल्या.
- याच कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री.राहुल खताळ यांचा ही विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
- यावेळी उपस्थित मान्यवरांनी दोन्ही सत्काूर्तींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

- या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रा मस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झा ला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री.संजय वले कर यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






