
चेअरमन कै भाऊसाहेब (अण्णा) गवारे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बावची जिल्हा परिषद शाळेला माईक व साऊंड सिस्टिम भेट.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मौजे बावची (ता. प रंडा) येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीचे माजी चेअरमन कै. भाऊसाहेब (अण्णा) गवारे यांच्या ६ व्या स्मृ तिदिनानिमित्त गवारे परिवाराच्या वतीने एक स्तुत्य उपक्र म राबवण्यात आला.
- त्यांच्या स्मृती दिनानिम्त बावची येथील जिल्हा परिषद कें द्रीय प्राथमिक शाळेला माईक आणि साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली.
- या उपक्रमातून कै.भाऊसाहेब गवारे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

- शाळेला मिळालेल्या या साऊंड सिस्टिममुळे विद्यार्थ्यांना सकाळचे राष्ट्रगीत, प्रार्थना, परिपाठ, तसेच इतर सामाजि क, सांस्कृतिक आणि कला-क्रीडा उपक्रम उत्तम रीतीने आत्मसात करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
- कै.भाऊसाहेब गवारे हे गावातील सामाजिक सलोखा ज पणारे आणि अत्यंत मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिचि त होते.
- सर्व समाजातील घटकांच्या अडीअडचणींना प्राधान्य देऊ न त्या सोडवण्यासाठी ते नेहमी तत्पर असायचे.
- कोरोनाच्या कठीण काळात हे अष्टपैलू व्यक्तिमत्व पडद्या आड झाले, परंतु त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे त्यांच्या आठवणी ग्रामस्थांच्या मनात कायमस्वरूपी जिवंत राहती ल, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आले.
- याप्रसंगी गवारे परिवारातील सदस्य अमोल गवारे, जयानं द गवारे, अभिजित गवारे, दयानंद गवारे, सौदागर गवारे, गणेश गवारे,विशाल गवारे, सत्यवान गवारे उपस्थित होते.
- तसेच शाळेचे मुख्याध्यापक सरवदे सर, गाढवे सर, बोबे मॅडम, गावचे सरपंच नानासाहेब रोडगे, सामाजिक कार्यक र्ते तथा ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ सरपणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू रोडगे, उपाध्यक्ष पांडुरं ग शिवतारे, अतुल थिटे, मंगेश खराडे, प्रवीण खराडे, प्रता प रोडगे यांच्यासह ग्रामस्थ, मित्र परिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






