
अहेरी महिला व बाल रुग्णालयाजवळ एस.टी. बस थांबा सुरू करण्याची सामाजिक कार्यकर्ते सचिन येरोजवार व आयुष मामीडवार यांची मागणी; आगार व्यवस्थापकांना निवेदन.
- प्रतिनीधी : स्वरूप गावडे :-अहेरी येथील महिला व बा ल रुग्णालयासमोर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंड ळाचा (एस.टी.) अधिकृत बस थांबा दया सामाजिक कार्य कर्ते #सचिन दिगंबर येरोजवार व आयुष मामीडवार यांनी अहेरी आगाराचे आगार व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले.
- निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अहेरी महिला व बाल रुग्णालयात दररोज उपविभागातल्या ग्रामीण भागा तील शेकडो महिला, गर्भवती माता, लहान मुले, ज्येष्ठ ना गरिक आणि विविध आजारांवरील उपचारासाठी रुग्ण येत असतात.

- मात्र, रुग्णालयासमोर एस.टी.चा अधिकृत थांबा नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अहेरी वरून दीड ते दोन किलोमीटर अंतर येन जान करावे लागत असल्यामुळे रु ग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
- विशेषतः गर्भवती महिला, नवजात बालकांसह प्रवास क रणाऱ्या माता, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गंभी र आजारांनी त्रस्त रुग्णांना मुख्य बसस्थानकापर्यंत पायी जावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक, शारीरिक व मान सिक ताण पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- या पार्श्वभूमीवर महिला व बाल रुग्णालयासमोर अथवा ल गत अधिकृत एस.टी. बस थांबा तातडीने सुरू करून अहे री आगारातून येणाऱ्या-जाणाऱ्या संबंधित बसांना येथे नि यमित थांबा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्या त आली आहे.
- या निर्णयामुळे हजारो रुग्ण, नागरिक व त्यांच्या कुटुंबीयां ची मोठी सोय होऊन सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक लोकाभिमुख आणि रुग्णहिताची ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






