विद्यार्थ्यांवरील पोलीस दडपशाही लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारी; जंतर-मंतरवरील पोलीस कारवाईनंतर शरद पवारांचा संताप.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- नीट (NEET-UG) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि ‘चलो संसद’ मार्च दरम्यान दिल्ली पो लिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
  • मंगळवारी (२१ जुलै २०२६) शरद पवार यांनी स्वतः जंत र-मंतर आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कार वाईची माहिती घेतली.
  • यावेळी त्यांच्यासोबत पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आ णि इतर प्रमुख खासदार उपस्थित होते.
  • थेट जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची घेतली भेटसोमवा री दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासा ठी केलेल्या बळाच्या वापरामुळे राजधानीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.
  • या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदोलनस्थ ळी पोहोचून कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक आणि युवा आंदोलक अभिजित दिपके यांच्यासह इतर विद्यार्थ्यांची भेट घेतली.
  • पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या विद्या र्थ्यांची त्यांनी आस्थेने चौकशी केली.
  • आंदोलकांनी पवारांना पोलिसांनी केलेल्या अमानुष कार वाईचे तपशील दिले आणि काही विद्यार्थ्यांची प्रकृती गं भीर असल्याचेही सांगितले.
  • लोकशाही मूल्यांचा खून; शरद पवारांची घणाघाती प्रति क्रियाभेट घेतल्यानंतर शरद पवार यांनी सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्र सरकार आणि दि ल्ली पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला.
  • ते म्हणाले:”नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर वि द्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी दिल्लीत उपोषण आणि आंदोलन करत आहेत.
  • मात्र, काल या आंदोलनकर्त्या तरुण-तरुणींसोबत पोलिसां नी जे वर्तन केले, ते अत्यंत निंदनीय असून लोकशाही मू ल्यांना हरताळ फासणारे आहे.
  • केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा अत्यंत संवेदनशी लतेने विचार करून तातडीने योग्य पावले उचलली पाहि जेत.
  • “विरोधक एकवटले; आंदोलनाला पाठिंबाशरद पवार यां च्या या भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे बळ मि ळाले असून दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
  • आंदोलक विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यां च्या राजीनाम्याची आणि विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.
  • शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांतील इतर अनेक बड्या नेत्यांनीही या ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांना आपला पा ठिंबा जाहीर केला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles