
“मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम शाळेत जमला वैष्णवांचा मेळा”
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथी ल मॉडर्न हायस्कूल इंग्रजी माध्यम शाळेत आषाढी एकाद शीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला.
- कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व भगवा न विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.

- चल ग सखे पंढरीला.. धरिला पंढरीचा चोर…अशा अनेक अभंगाचे गायन विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने केले. विविध भ जनाचा गजर करीत यमुनानगर परिसरात फेरी काढण्यात आली.
- विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदुंगा च्या गजरात दिंडी काढली.”ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पांडु रंग हरी”च्या जयघोषाने संपूर्ण शाळेचे वातावरण भक्तिम य झाले.
- विद्यार्थ्यांनी अभंग, भजन व विठ्ठलभक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
- मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी आषाढी एकादशीचे धा र्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच संतांच्या विचारांचे आचरण करून चांगले नागरिक बनण्याचा संदेश दिला.
- या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध वारकरी परं परेची ओळख झाली आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदर भाव निर्माण झाला.

- उपक्रमाचे कौतुक प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,सहकार्यवाह प्रा.डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,सेक्रेटरी प्रा. डॉ.शामकांत देशमुख,शाळा समितीचे अध्यक्ष दीपक मराठे, व्हिजिटर प्रा.डॉ. अतुल पाठक,मुख्याध्यापिका गौरी सावंत यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






