
जि.प. माध्यमिक शाळा, सोनारी: चार वर्षांपासून पदे रिक्त; ग्रामस्थांचा ३१ जुलैपासून आंदोलनाचा इशारा . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ, पालक आणि शा ळा व्यवस्थापन समितीने थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे.
- ३० जुलै २०२६ पर्यंत शिक्षक व इतर रिक्त पदे न भरल्या स, ३० जुलैपासून शाळेला कुलूप ठोकून व ३१ जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- नेमका वाद काय?
- सोनारी येथील जि.प. शाळेत इ. पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग भरतात आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या ३५० पेक्षा अधि क आहे.
- मात्र, गेल्या चार वर्षांपासून (२०२३ पासून) गणित व वि ज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे माध्यमिक शिक्षक, तसेच कनिष्ठ लिपिक आणि परिचर ही पदे रिक्त आहेत.

- विशेष म्हणजे, ९ जुलै २०२६ रोजी झालेल्या समुपदेशन बैठकीत या शाळेसाठी के.बी.कोळी या एका शिक्षकाच्या नियुक्ती आदेश देण्यात आले होते.
- परंतु, लेखी आदेश निघण्यापूर्वीच संबंधित शिक्षकाने जि ल्हा परिषदेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संगनमत करू न आर्थिक देवाणघेवाणीतून आपली नियुक्ती बदलवून घे तल्याची चर्चा गावात आहे.

- या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कार वाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ..
- गणित आणि विज्ञानसारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासा ठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- विज्ञान शिक्षक नसल्यामुळे प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके पू र्णपणे बंद असून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक समज खुंटली आहे. नियमित अध्यापन न झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खचत चालला आहे.
- प्रशासनास अंतिम इशारा…
- मागील चार वर्षांत अनेकदा निवेदने देऊन, पत्रव्यवहार क रून आणि आंदोलने करूनही प्रशासनाकडून केवळ ता त्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती.
- यावर्षीही शैक्षणिक सत्र सुरू होऊनही शिक्षक मिळाले नाहीत.
- ३० जुलै २०२६ पर्यंत पदे भरली गेली नाहीत तर ३१ जुलै पासून शाळा बंद ठेवून (कुलूप ठोकून) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयीन दा लनात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्या त आला आहे.
- या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थे च्या प्रश्नाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.

- या निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीचे (माध्यमिक) अध्यक्ष दीपक सुरवसे, (प्राथमिक) अध्यक्ष गणेश फले यांच्यासह सोनारी येथील ८० हून अधिक पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
- हे निवेदन नुकतेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परि षद, धाराशिव यांना समक्ष भेटून सविस्तर चर्चेदरम्यान दे ण्यात आले असून, याची प्रत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनाही माहितीस्तव पाठवण्यात आली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






