तांदुळवाडी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न; विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांनी गौरवले.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- तांदुळवाडी ढवळे परिवाराच्या वतीने व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी धा राशिव जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या संकल्पनेतू न, स्वर्गीय गणपत ढवळे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले ल्या नयनरम्य राधाकृष्ण मंदिरात यावर्षीचा श्रीकृष्ण ज न्माष्टमी व दहीहंडी उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंद मय वातावरणात साजरा करण्यात आला.
  • या निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तांदुळवाडी व परिसरातील भजनी मंडळांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.
  • या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘श्रीकृष्ण सामाजि क शैक्षणिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या’ वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • या मान्यवरांना मिळाले पुरस्कार:उत्कृष्ट कीर्तनकार पुर स्कार: संगीत विशारद ह.भ.प. भाग्यवान रोडगे महाराज बावचिकर आणि तांदुळवाडी गावचे सुपुत्र ह.भ.प. हनुमंत कोरे महाराज यांना प्रदान करण्यात आला.
  • उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार: तांदुळवाडी गावचे सुपुत्र व माजी सरपंच श्री.बाजीराव दुरुंदे आणि श्री.भालचंद्र खर सडे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल देण्यात आला.
  • आदर्श माता पुरस्कार: महिलांमधून ग.भा.मौजाबाई भा गवत बोराडे यांना हा बहुमान मिळाला.
  • नवजीवन पुरस्कार: तांदुळवाडी गावचे सुपुत्र श्री. गोरख महादेव चौधरी यांना देऊन गौरविण्यात आले.
  • या मंगलमयी प्रसंगी श्रीकृष्ण सामाजिक शैक्षणिक बहुउद्दे शीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.आबासाहेब गणपत ढवळे, संचालक श्री.बापूसाहेब गणपत ढवळे, श्री.तानाजी गणपत ढवळे, माजी सरपंच सौ.मीनाक्षी संजय गोरे, श्री. श्रीराम खरसडे, माजी उपसरपंच भालचंद्र पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री.विष्णू खरसडे प्रामु ख्याने उपस्थित होते.
  • तसेच नितीन खरसडे, रंजीत खरसडे, धैर्यशील जगताप, यश ढवळे, ऋषिकेश ढवळे, विलास खरसडे, भाऊसाहेब कुंभार, प्रवीण खरसडे, अनुप मुळूक, अमोल गोरे, ह.भ.प. सोपान वाघमारे, ह.भ.प. व्यंकट दुरुंदे, ह.भ.प. जयदीप हवलदार, ह.भ.प. मच्छिंद्र हवालदार, ह.भ.प. सुनील खर सडे, ह.भ.प. बळीराम मुळूक, ह.भ.प. पप्पू होरे, प्रकाश ढवळे यांच्यासह संपूर्ण तांदुळवाडी ग्रामस्थ, पंचक्रोशीती ल नागरिक आणि इतर गावांतील आजी-माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ढवळे परिवाराने व ग्राम स्थांनी विशेष परिश्रम घेतले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles