
तळगाव गुणगौरव समिती कडून सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री नारायण दत्ताराम राणे यांची सदिच्छा भेट.
- प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- श्री.नारायण दत्ताराम राणे त ळगाव (शेळवणे वाडी ) मालवण हे महाराष्ट्र पोलीस दला तून पोलीस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाले.
- तळगाव गुणगौरव समितीतर्फे त्यांची त्यांच्या लोअर परेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना सेवानिवृ त्ती नंतरच्या आयुष्यातील नव्या पर्वा साठी शुभेच्छा देण्या त आल्या.
- याप्रसंगी सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे ट्रस्टी श्री गोपाळ जी रघुनाथ दळवी उपस्थित होते. निवृत्तीनंतर सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा व आरोग्य जपण्याचा सल्ला श्री गोपाळ जी दळवी यांनी यावेळी श्री नारायण राणे यांना दिला.

- श्री नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ३७ वर्ष पोलीस सेवा इमाने इतबारे केली. राष्ट्र्पती पदक विजेते वडील कै श्री दत्ताराम राणे यांना अभिमान वाटेल अशी प्रतिमा जपली.
- कोविड काळातले कर्तव्य बजावतानाचे कटू अनुभव, कुटुं बाला न देऊ शकणारा वेळ, वडिलांची शिकवण याबद्दल अनुभव सांगितले.
- सौं मनीषा नारायण राणे यांनी पोलीस पत्नी म्हणून घरा च्या जबाबदाऱ्या सांभाळताना कोणत्या आव्हानांचा साम ना करावा लागतो.
- इतर कुटुंब सण साजरे करत असताना,स्वतः मात्र उशिरा दाराकडे कर्तव्यावर असणाऱ्या पतीची वाट पाहत बसाव लागतं.
- पण त्यांतही अभिमान असतो पतीच्या कर्तव्यदक्ष आणि सामाजिक स्वास्थ्य जपणाऱ्या कामाचा अशा भावना बोलून दाखवल्या.
- तळगाव हितवर्धक संघांचे उपाध्यक्ष मा.श्री.सुनील बापू द ळवी, तळगाव गुणगौरव समितीचे अध्यक्ष श्री सुभाष मात वणकर, कार्यवाहक श्री नितीन सावंत, श्री अमोल दळवी, समिती चे हितचिंतक श्री वैभव दळवी, समितीचे प्रसिद्धी प्रमुख श्री सचिन राणे, कु सलोनी राणे, कु तीर्था मंदार दळवी यावेळी उपस्थित होते.
- श्री नारायण दत्ताराम राणे यांना निवृत्ती नंतरच्या निरोगी आणि दिर्घ आयुष्यासाठी श्री देव रामेश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






