परंडा बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थी शैक्षणिक लाभापासून वंचित; शिक्षकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

  • प्रतिनीधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील बँक ऑफ इंडिया शाखेच्या व्यवस्थापकांच्या मनमानी आ णि ढिसाळ कारभारामुळे शेकडो विद्यार्थी शासकीय शैक्ष णिक लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
  • परंडा गटशिक्षण कार्यालय अंतर्गत समग्र शिक्षा अभियान (SMA) अंतर्गत विद्यार्थ्यांची खाती उघडण्याचे काम रख डल्यामुळे, शासनाचा लाखो रुपयांचा निधी परत जाण्या ची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
  • या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी आता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
  • ४९ शाळांचे कामकाज अपूर्ण, लाखो रुपयांचा निधी परत जाण्याचा धोका मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एकूण १४ केंद्रांपैकी केवळ ६५ शाळांमधील विद्यार्थ्यांची खाती पूर्ण करण्यात आली आहेत.
  • मात्र, उर्वरित ४९ शाळांमधील विद्यार्थ्यांची बँक खाती अ द्याप उघडण्यात आलेली नाहीत. बँक ऑफ इंडियाच्या परंडा शाखाधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे आणि सहकार्य न करण्याच्या भूमिकेमुळे हे काम रखडल्याचा थेट आरोप होत आहे.
  • केवळ दोन दिवसांत ही खाती उघडली गेली नाहीत, तर शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी आलेला लाखो रुपयांचा शै क्षणिक निधी मुदतीअभावी परत जाऊ शकतो.
  • 87 खाती पूर्ण तर 62 शाळांची खाती अपूर्ण झोनल अधि कार्‍यांकडे शासकीय कारवाईची मागणी शाखाधिकार्‍यां च्या या अडवणुकीच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्ष णिक नुकसान होत आहे.
  • या प्रकरणी बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर येथील झोनल अधिकार्‍यांकडे (विभागीय व्यवस्थापक) लेखी तक्रार दा खल करण्यात आली असून, संबंधित परंडा शाखाधिका र्‍यांवर तात्काळ कडक शासकीय कारवाई करण्यात या वी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
  • दोन दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इ शारा विद्यार्थ्यांचे भविष्य आणि हक्काचा निधी वाचवण्या साठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
  • जर येत्या दोन दिवसांत ही सर्व प्रलंबित बँक खाती उघडू न विद्यार्थ्यांना न्याय दिला नाही, तर तालुक्यातील समस्त शिक्षकांच्या वतीने बँक प्रशासनाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
  • या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी बँक प्रशासनच जबाबदार असेल, असेही निवेदनात स्पष्ट कर ण्यात आले आहे.
  • यानिवेदणावरशिक्षक समिती चे जिल्हाध्यक्ष रमेश बारस्क र, रामदास होरे, धन्यकुमार सुतार, बाळासाहेब शिंदे, श्रीमं त टेंगळे, धनराज बनसुडे, रघुनाथ कदम, प्रशांत बरबडे, लक्ष्मण सूर्यवंशी इत्यादिच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles