
परंड्यात इंस्टाग्रामवरून ओळख, घरात घुसून विनयभंगाचा आरोप! फोटो व्हायरल करण्याची धमकी; ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हा दाखल….!
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- सोशल मीडियावर ओळख वाढवून महिलांना त्रास देण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे.
- परंडा शहरात इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
- तसेच तिचे फोटो पतीला दाखवण्याची आणि सोशल मी डियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रका र घडला आहे.

- या प्रकरणी परंडा पोलिसांत अनुसूचित जाती-जमाती अ त्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- रात्रीच्या वेळी घरात घुसून गैरवर्तन
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा येथील पीडित म हिलेची सुमारे २० दिवसांपूर्वी इंस्टाग्राम या सोशल मीडि या प्लॅटफॉर्मवर आरोपी तरुणाशी ओळख झाली होती.
- या ओळखीचा फायदा घेत आरोपीने सतत मेसेज आणि फोन करून महिलेला भेटण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.
- तक्रारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दीड वाजता आणि त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी रात्री दोनच्या सुमारा स आरोपीने महिलेच्या राहत्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला.
- यावेळी त्याने महिलेशी अश्लील चाळे व गैरवर्तन करून तिचे फोटो काढले.
- हे फोटो महिलेच्या पतीला दाखवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी आरोपीने दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
- परंडा पोलिसांत गुन्हा नोंद
- या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात २६ ऑ क्टोबर २०२६ रोजी FIR क्रमांक ०५०५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रति बंधक अधिनियमातील कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ७४, ७८, ३३३ आणि ३५१(२) अंतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
- पोलीस उपअधीक्षकांकडे तपासाची सूत्रे
- या घटनेचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षा त घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक चोरमले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
- या घटनेमुळे परंडा शहरात खळबळ उडाली असून, पोली स तपास करीत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






