वडवली हायस्कूलच्या कुमारी अस्मिता पळसमकरची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- दि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी एस. व्ही.जे.सी.टी. क्रीडा संकुल, डेरवण येथे आयोजित राष्ट्रीय आंतरजिल्हा ज्युनिअर ॲथलेटिक्स स्प र्धा २०२६ मध्ये श्रीमती उमाताई शरद परुळकर माध्यमि क विद्यालय, वडवली या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी अस्मिता महादेव पळसमकर हिने ८० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला.
  • अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर अस्मिताने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
  • तिच्या या यशामुळे दिनांक १४ ते १६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑक्सन विद्यापीठ कामकोले, हैदराबाद, ते लंगणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
  • अस्मिताच्या या यशामुळे तिचे मार्गदर्शक प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री. नालापल्ले सर, तिचे पालक, संस्थेचे पदाधि कारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे सर,आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तिचे अभिनंदन कर ण्यात येत आहे.
  • तिच्या या यशाने वडवली प्रशालेसह राजापूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.अस्मिताच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles