
दुष्काळ आणि महागाईचा दुहेरी फटका: यंदा आकाश दिवे केरसुणी, – पणत्या आणि रांगोळीच्या दरात मोठी वाढ…!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यात यंदा पडलेला दुष्काळ आणि सातत्याने वाढणारी महागाई याचा थेट फटका सणासुदीच्या बाजारपेठेला बसला आहे.
- दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ला गली असून,मागील वर्षाच्या तुलनेत यंदा केरसुणी, पणत्या आणि रांगोळीच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

- या वाढत्या महागाईमुळे बाजारपेठेतील प्रमुख घटक अस लेल्या किराणा आणि कापड व्यवसायालाही मोठा फटका बसला असून खरेदीदारांचा प्रतिसाद कमालीचा घटला आहे.
- केरसुणीच्या दरात दुप्पट वाढ
- दिवाळी लक्ष्मीपूजनाला लागणारी आणि घरोघरी पवित्र मानली जाणारी केरसुणी यंदा सर्वसामान्यांसाठी महागली आहे.
- गेल्या वर्षी बाजारात चाळीस रुपयांना मिळणारी केरसुणी यंदा थेट सत्तर रुपयांवर पोहोचली आहे.

- कच्चा माल महागल्याने आणि वाहतूक खर्च वाढल्याने के रसुणीच्या दरात ही वाढ झाल्याचे स्थानिक व्यापारी घन शाम शिंदे आणि रोहित शिंदे यांनी सांगितले.
- पणत्या आणि रांगोळीही महागली
- केवळ केरसुणीच नव्हे, तर दिवाळीची शोभा वाढवणाऱ्या मातीच्या पणत्या आणि अंगण सजवणारी रांगोळी यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.

- दुष्काळामुळे पाण्याची टंचाई आणि पणत्या बनवण्यासा ठी लागणाऱ्या मातीची टंचाई निर्माण झाल्याने कुंभार बांधवांना पणत्यांचे दर वाढवावे लागले आहेत.
- तसेच रांगोळीचे रंग आणि पांढरी रांगोळीही गेल्या वर्षा च्या तुलनेत महाग झाली आहे.

- किराणा आणि कापड बाजारात शुकशुकाट
- दुष्काळामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण कोलमडले असून, त्याचा थेट परिणाम शहरातील बाजारपेठेवर दिसत आहे.
- दिवाळीनिमित्त होणारी किराणा मालाची आणि कपड्यां ची खरेदी यंदा अत्यंत थंडावली आहे.
- किराणा दुकानांमध्ये तेल, तूप, सुकामेवा आणि इतर सा हित्याचे दर वाढल्याने ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण मर्यादित केले आहे.

- दुसरीकडे, दरवर्षी दिवाळीला कपडे खरेदीसाठी हाऊसफु ल्ल राहणारी कापड दुकाने यंदा ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत.
- व्यापारी वर्ग हवालदिल
- “दुष्काळामुळे लोकांकडे पैसा नाही आणि त्यातच महागाई वाढल्याने ग्राहक बाजारात येईनासा झाला आहे.
- किराणा आणि कपड्यांच्या खरेदीला मोठा फटका बसला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्क्यांहून अधिक व्यवसाय घटला आहे,” अशी चिंता स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

- कुलूपबंद खिशामुळे यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठीही अत्यंत चिंतेची ठरणार असल्या चे चित्र सध्या परंडा बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






