
कळंब पोलीसांची धाडसी कारवाई: अपहरण गुन्ह्यातील आरोपी अटकेत, थरारक पाठलाग करून मुलीची सुटका.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-घरात घुसून जातीवा चक शिवीगाळ करत, कोयत्याचा धाक दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपींना कळंब पो लिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अत्यंत धाडसीपणे अटक केली आहे.
- पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे आरोपींच्या गाडीचा माग काढत अवघ्या काही तासांत मुलीची सुखरूप सुट का केली.

- या प्रकरणी रमेश कानगे (वय २३, रा. बोर्डा, ता. कळंब, जि.धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अभि जीत उर्फ तन्या अर्जुन नवाट (रा.कोठाळवाडी), किरण भागवत तुपारे (रा.बोरगाव, ता.कळंब), अजय रामकिसन माने (रा.परळी रोड बायपास, कळंब) आणि इतर एकावि रुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जा ती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- काय आहे घटना?
- दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजण्याच्या सुमारास, नमूद आरोपींनी संगणमत करून फिर्यादी रागि णी कानगे यांच्या घरात बेकायदेशीर प्रवेश केला.
- आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
- त्यानंतर त्यांना जबरदस्तीने ‘इर्टिगा’ गाडीत (क्रमांक MH 20 DV 0357) बसवून बोर्डा ते दगडवाडी शिवारातील खडी केंद्राच्या दिशेने अंबाजोगाईकडे (जि. बीड) पळवून नेले.
- तांत्रिक तपास आणि सिनेस्टाईल थरार:
- घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली.
- मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक तात्काळ रवाना करण्यात आले.
- पोलीस निरीक्षक शेख यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत आरोपींच्या गाडीतील जीपीएस (GPS) ट्रॅक केले. ते सातत्याने पथकाला गाडीचे लाईव्ह लोकेशन देत होते.
- जीपीएस लोकेशनचा पाठलाग करत पोलीस पथक अंबा जोगाई येथील एका खदाणीजवळ पोहोचले.
- त्यावेळी गाडीत आरोपी अपहृत मुलीला मारण्याचा प्रय त्न करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
- परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस हवालदार (बकल नंबर १४६७) गणेश वाघमोडे यांनी स्वतःच्या जीवाची पर वा न करता अत्यंत शिताफीने आरोपीवर झडप घातली आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मुलीचा जीव वाचला.
- यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:
- सदरची उल्लेखनीय आणि धाडसी कामगिरी धाराशिव च्या माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री.सचिन पांडकर व उपविभागीय पो लीस अधिकारी श्री.संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
- कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. शकील शेख, पोलीस उपनिरीक्षक सिराज पठाण, पोलीस हवालदार १४६७ गणेश वाघमोडे, पोलीस नाईक १४६५ भाऊसाहेब पोळ, पोलीस कॉन्स्टेबल ४८५ परमेश्वर कदम, पोलीस कॉन्स्टेब ल ८३२ आसाराम खाडे आणि पोलीस कॉन्स्टेबल १७७७ अनिल भोसले यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजाव ली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






