
कोठारे येथे लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी; ग्रामस्थांचे श्रमदानातून जलसंधारण.
- प्रतिनीधी : कोठारे : हिराजी देसले :- पाणी अडवा, पा णी जिरवा या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीतून हातभार लाव त शहापूर तालुक्यातील कोठारे येथे ग्रामस्थांनी एकजुटीने केवळ श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी केली आहे.
- कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता गावातील महिला, पुरुष आणि युवकांनी एकत्र येत हा उपक्रम राबविला.

- पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग परिसरातील शेती व भूजल पातळी वाढविण्यासाठी व्हा वा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
- विशेष म्हणजे या कामात महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येत श्रमदान करून सामा जिक एकजुटीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला.
- आजच्या काळात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असताना केवळ शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन गावाच्या विकासासाठी काम कर ण्याची गरज आहे, हे कोठारे ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
- शासनाच्या निधीपेक्षा ग्रामस्थांच्या श्रमशक्तीवर उभा राहिलेला हा वनराई बंधारा म्हणजे लोकसहभाग आणि एकजुटीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

- ‘गावासाठी आपण काहीतरी केले पाहिजे’ या भावनेतून एकत्र आलेल्या ग्रामस्थांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






