
लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच खासापुरी शिवारात वीज पडून/स्पार्किंगमुळे १३ एकर ऊस जळून खाक; शेतकरी हवालदिल.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-तालुक्यातील खासा पुरी नं.२ शिवारात आज रविवारी (दि. ८ नोव्हेंबर २०२६) दीपावली सणाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
- वीज वितरण कंपनीच्या डीपी किंवा तारांमधील अचानक झालेल्या विद्युत स्पार्किंगमुळे लागलेल्या भीषण आगीत ऐन तोडणीला आलेला तब्बल १३ एकर ऊस जळून पूर्ण पणे खाक झाला आहे.

- लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हाता तोंडाशी आलेला घास हि रावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बाधि त शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत.
- मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३:३० वाजण्या च्या सुमारास खासापुरी शिवारातील ऊसाच्या पिकाला अचानक आग लागली.
- वाळलेले पाचट आणि वाऱ्याचा वेग जास्त असल्याने का ही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे लोट पा हून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
- मात्र, आगीची दाहकता एवढी मोठी होती की, शेतकऱ्यांचे सर्व प्रयत्न तोकडे पडले आणि डोळ्यादेखत उभं पीक जळून कोळसा झालं.
- या आगीत परिसरातील पाच शेतकऱ्यांचे अतोनात नुक सान झाले असून, यामध्ये बाळासाहेब देशमुख (४ एकर), पोपट देशमुख (४ एकर),विठ्ठल देशमुख (३ एकर), सदानं द देशमुख (१ एकर) आणि गजानन देशमुख (१ एकर) अशा एकूण १३ एकर ऊसाचा समावेश आहे.
- आधीच दुष्काळी परिस्थिती आणि त्यात ऐन तोडणीच्या तोंडावर संपूर्ण ऊस जळाल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी भीषण स्थिती या शेतकरी कुटुंबांवर ओढवली आहे.
- महावितरणच्या कारभारामुळे हे नुकसान झाले असल्या चा आरोप करत, प्रशासनाने तातडीने या घटनेचा पंचना मा करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या वी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






