धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; चटणी-भाकर खाऊन शासनाचा निषेध.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- दुष्काळग्रस्त शेतक री, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्या साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने.
  • निवासी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर
  • राज्यातील अनियमित पावसामुळे निर्माण झालेली गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, शे तमजुरांच्या हाताला काम नसणे आणि ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेची होणारी आर्थिक ओढाताण या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले.
  • जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली झाले ल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चटणी-भाकर खाऊन शासनाच्या शेतकरी व कष्टकरी विरोधी धो रणांचा तीव्र निषेध नोंदविला.
  • यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या हाता तून खरीप पिके गेली आहेत. अनेक ठिकाणी पिके करपू न नष्ट झाली असून, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्या च्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.
  • शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भा गातील कष्टकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
  • त्यातच वाढती महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक अडच णींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
  • सर्व बाधित घटकांना आर्थिक मदत देण्याची मागणी
  • “दुष्काळ हे केवळ जमीनधारक शेतकऱ्यांपुरते मर्यादित संकट नसून, त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थ व्यवस्थेवर होत आहेत.
  • भूमिहीन नागरिक,शेतमजूर, रोजंदारी कामगार, परित्यक्ता महिला, पशुपालक, दूध उत्पादक, लघुउद्योजक आणि बेरोजगार युवक यांनाही या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
  • त्यामुळे शासनाने दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना आ खताना केवळ जमीनधारक शेतकऱ्यांचा विचार न करता, ग्रामीण भागातील सर्व बाधित घटकांचा समावेश करावा.
  • प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र मदत व पुनर्वसन योजना जाही र करून पात्र लाभार्थ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,” अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
  • आंदोलनानंतर या मागण्यांचे सविस्तर निवेदन निवासी जिल्हाधिकारी विद्याचरण कवडकर यांना देण्यात आले.
  • आंदोलनात पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
  • या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनं जय सोनटक्के, महासचिव नासिर शेख, फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक प्रा.डॉ.शहाजी चं दनशिवे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शितल चव्हाण, काम गार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधीर वाघमारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles