गंभीर अन् दुर्मिळ आजारामुळे पंगू झालेला चिमुकला चालत गेला घरी; डॉक्टर बनले देवदूत
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : ईरफान शेख :- अवघ्या १४ वर्षांच्या एका मुलाला दुर्मिळ अशा‘गुलियन बेरी सिंड्रोम’ या असाध्य व्याधीने ग्रासले. त्यामुळे रोज खेळणारा मुलगा अचानक लुळा पांगळा झाला.
- पण डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी त्याचा जीव तर वाचलाच पण तब्बल ४० दिवसांनी हा मुलगा स्वतःच्या पायावर उभा झाला. कोविड नंतर या आजारात वाढ झाल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.
- मूळचा अकोला येथील प्रणब ढोंबरे हा शाळकरी मुलहा शाळेत जातानाच अचानक लुळा पांगळा होऊन खाली कोसळला.
- वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ अशा‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या असाध्य व्याधीने त्याला ग्रासल्याचे निदान झाले. त्याला नागपुरातील वोक्हार्ट रुग्णालयात उपचारार्थ आणले.
- मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमित भाटी यांच्या मार्गरदर्शनात उपचार सुरू झाले. परिस्थिती बेताची होती, पण लेकराचा जीव वाचवण्यासाठी आईवडिलांनी उसनवारी केली.
- ४० दिवसांच्या उपचारात २८ दिवस तो व्हेंटिलेटर वर होता. रुग्णालयानेही मदत केली. योग्य उपचाराने तो बरा होऊन तो घरी परतला.
- कोरोनानंतर वाढतोय ‘गुलियन बेरी सिंड्रोम’
- कोरोनाच्या बाधेनंतर विविध आजारांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. यात ‘गुलियन बेरी सिंड्रोम’ (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
- पण हा अतिशय दुर्मिळ आजार असून दहा लाखांत एखादा रुग्ण या आजाराचा आढळून येतो. मात्र कोरोनानंतर वर्षभरातच सात ते आठ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती डॉ. अमित भाटी यांनी दिली.
- हवेवाटे हा अज्ञात विषाणू शरीरात शिरतो. दोन दिवस ते दोन आठवड्यांच्या कालावधीत स्नायू व रक्तवाहिन्यांची ताकद कमी होते.
- रुग्ण उभे राहण्याची ताकदच गमावून बसतो. रुग्णाची अवस्था पक्षाघात झाल्यासारखी होते. पण तातडीने निदान व उपचार झाले तर रुग्ण पूर्ण बरा होतो.
- सिटी स्कॅनमधून संबंधित व्यक्तीला लकवा नसल्याचे निदान झाल्यानंतर रक्त तपासणी, नसांचे स्कॅनिंग, कमरेतील पाण्याच्या अहवालातून ‘जीबीएस’चे निदान होते.
- या रुग्णाला ‘इमिओग्लोब्युलेंट’ची इंजेक्शन द्यावी लागतात.
- -डॉ. अमित भाटी,मेंदूरोग तज्ज्ञ नागपूर.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space