गेल्या आठवड्याभरात सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, नवीन वर्षात काय होईल ते जाणून घ्या ( Gold Price )
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
रिपोर्टर: न्यूज रूम ऑपरेटर : Gold Price : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात साप्ताहिकरित्या वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर चांदी देखील महागली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 481 रुपयांची किंचित वाढ नोंदवण्यात आली तर चांदीच्या दरात प्रति किलो 339 रुपयांची वाढ झाली आहे.
IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (26 डिसेंबर ते 30 डिसेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 54,386 होता, जो शुक्रवारपर्यंत वाढून 54,867 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी, 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 67,753 रुपयांवरून 68,092 रुपये प्रति किलो झाली आहे. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)
26 डिसेंबर 2022 – 54,386 रुपये प्रति 10 ग्रॅम
27 डिसेंबर 2022 – 54,639 रुपये प्रति 10 ग्रॅम
28 डिसेंबर 2022 – 54,571 रुपये प्रति 10 ग्रॅम
29 डिसेंबर 2022 – 54,651 रुपये प्रति 10 ग्रॅम
30 डिसेंबर 2022 – 54,867 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)
26 डिसेंबर 2022 – 67,753 रुपये प्रति किलो
27 डिसेंबर 2022 – 68,768 रुपये प्रति किलो
28 डिसेंबर 2022 – 67,848 रुपये प्रति किलो
29 डिसेंबर 2022 – 67,840 रुपये प्रति किलो
30 डिसेंबर 2022 – 68,092 रुपये प्रति किलो
सोने गाठणार 61 हजारांची पातळी
हे लक्षात घ्या कि, जगभरातील केंद्रीय बँका सातत्याने सोन्याची खरेदी करत असल्याचे कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सोन्यामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे. ज्यामुळे या वर्षी सोन्याचा भाव 58,888 ते 61,111रुपयांपर्यंत पोहोचू शकेल, असे मत कमोडिटी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. Gold Price अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/ सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space