
गोरेगाव एसटी स्थानकावरील शौचालयांची दुर्दशा – प्रवाशांना गंभीर त्रास….!
- प्रतिनिधी : रायगड : प्रमोद तरळ :- दि. १६ मे २०२५ रोजी दापोली ते मुंबई असा प्रवास करीत असताना गोरेगा व (ता. माणगाव, जि. रायगड) एसटी स्थानकावर बस चहापानासाठी थांबली.
- दापोली व मंडणगड मार्गावरील अनेक एसटी बसेस येथे थांबतात आणि प्रवासी इथे विश्रांती घेतात.

- परंतु, येथे एक अतिशय गंभीर बाब प्रकर्षाने लक्षात आली – स्थानकातील सार्वजनिक शौचालय व मुतारी अत्यंत अ स्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त अवस्थेत आहेत.
- त्या इतक्या घाणेरड्या आहेत की महिलांसोबतच पुरुषां नाही त्यांचा वापर करता येत नाही.
- कॅन्टीनच्या मागील बाजूस असलेल्या या शौचालयांच्या आजूबाजूला प्रचंड दुर्गंधी पसरलेली असून, त्यामुळे प्रवा शांच्या आरोग्यावरही प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
- दररोज हजारो प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात,तरी ही यावर कोणीही आवाज का उठवत नाही, हा प्रश्न उभा राहतो.
- स्थानीय प्रशासन, एसटी विभाग, राजकीय नेते आणि सा माजिक कार्यकर्ते यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.

- प्रवाशांचे आरोग्य आणि सुविधा लक्षात घेता, शौचालयां ची नियमित स्वच्छता, देखभाल आणि आवश्यक ती सुधा रणा केली जावी मागणी दापोलीकर प्रवासी नरेश पांगत यांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






