
गावाचे गावपण टिकवण्यासाठी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण..!
- प्रतिनिधी : डहाणू : प्रमोद तरळ :- संकल्पनांच्या वृक्षा रोपणातून मधुर फळे आणि समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य वैतरणा येथील सामाजिक कार्यकर्ते, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष ,श्रमजीवी संघटनेचे सदस्य श्री सतीश धर्मा गावड हे अनेक वर्षांपासून करत आहेत.

- वाढदिवस म्हटला की जल्लोष,शुभेच्छांचा वर्षाव केक, पा र्टी आणि एक दिवसाचा तो आनंद, उत्साह मात्र हा आनंद हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा कधीच न येणारा असतो.
- त्यामुळे ही जाणीव लक्षात ठेऊन निसर्गाचे संतुलन टिकून राहण्याच्या दृष्टीने आणि काळाची गरज लक्षात घेऊन गा वड यांनी ही संकल्पना हाती घेतली आहे.

- त्यामध्ये वृक्षारोपणा सोबत रक्तदान शिबिर, गरजू विद्या र्थ्यांना शालेय साहित्य,रेल्वे स्थानक , गाव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम ते आपल्या आणि सं स्थेच्या, वैतरणा स्टेशन कमिटीच्या सदस्यांच्या वाढदिवसा निमित राबवत असतात.
- यातील मुख्यतः वैतरणा येथील फणसपाडा गावात त्यां च्या संकल्पनेतून असंख्य फणसाची झाडे लावण्यात आ ली आहेत आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त लावलेल्या अनेक झाडांना मोठ मोठे फणस देखील लागल्याचे आज पहायला मिळत आहे.

- त्यामुळे गावाच्या नावाप्रमाणे गावात फणसाची झाडे अ सावी ही त्यांची संकल्पना अगदी वाखाणण्याजोगी जोगी आहे.
- आज ८ जून त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या वृक्षारो पणासाठी गावड यांचा मित्र परिवार, संस्थेचे अध्यक्ष नाग देव पवार,सचिव दयानंद पाटील, सहसल्लागार श्री सखा राम पाटील, सेवा निवृत्त श्री नवनीत पाटील साहेब,साई पोल्ट्री फॉर्म वसई श्री साई पाटील, श्री अरुण माने, अनि केत पाटील, DVPSS वैतरणा स्टेशन कमीटी अध्यक्ष लक्ष्मण वैती,सचिव गिरीधर टोकरे ,रूपाली राऊत इत्यादी उपस्थित होते.

- वाढदिवसा निमित्त झाडे लावणे ही संकल्पना मुळात क मी खर्चाने खूप काही मिळवून देणारी आहे.
- सध्याच्या युगात तरुण पिढीची वाढदिवस साजरा करण्या ची पद्धत पाहता अगदी क्षणभर आनंद आणि आठवणीत राहण्यासारखे असे काही असते असे दिसत नाही.
- त्यामुळे आपल्या आयुष्यातील इतक्या महत्वाच्या दिवशी आठवण म्हणून लावलेली झाडे आणि लावलेल्या झाडां मधून निसर्गाचे संतुलन टिकून राहण्यासोबत ,समाजाला, येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होणार असेल तर प्रत्येक व्यक्तीने अशा महत्वाच्या दिवशी एक तरी झाड नकीच लावावे.
- असे आवाहन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतिश धर्मा गावड यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











