नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज कडकडीत बंद; सर्व शाळां महाविद्यालयांना सुटी जाहीर. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज कडकडीत बंद; सर्व शाळां महाविद्यालयांना सुटी जाहीर.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : सचीन गीरी :- अंतरवाली सराटी (जि.जालना) येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने आज (ता. ५) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
  • लाठीमाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमं त्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, लाठीचार्ज व गोळीबार करणाऱ्या पोलिस अधीक्षक व उपपोलिस अधी क्षक यांना बडतर्फ करावे, अशी मागणी समाजाने केली.
  • दरम्यान,जनरल डायर कोण रे; पायताण मारा दोन रे, मराठ्यांच्या जीवावर उठणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, बेजबाबदार मुख्यमंत्र्यांचं करायचं काय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
  • सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात जवाब दो आंदोलन झाले.अंतरवाली सराटी येथे मराठा आंदो लकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासा ठी मराठा बांधव सकाळी अकरा वाजता चौकात जमले.
  • हातात भगवे झेंडे घेऊन ठिकठिकाणांहून बांधव आले होते. चौकात येताच त्यांनी सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला.
  • मराठा महिला भगिनींच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर घोषणांना जोर चढला.
  • ‘चले जाव, चले जाव फडणवीस चले जाव, जवाब दो जवाब दो महाराष्ट्र सरकार जवाब दो, शाहूनगरी चा एकच निर्धार बेजबाबदार सरकारला खाली खेच णार, मराठा आंदोलकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या नादान सरकारचा धिक्कार असो,
  • बेजबाबदार मुख्यमंत्र्यांचं करायचं काय; खाली डोकं वर पाय, गृहमंत्र्यांचं करायचं काय; खाली डोकं वर पाय, मराठा समाजाला आरक्षण न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,
  • मराठा भगिनींवर हल्ला करणाऱ्या भेकडी वृत्ती सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी चौक दणाणून गेला.
  • आंदोलनानंतर अचानक पावसास सुरुवात झाली. तरीही आंदोलक चौकात थांबून होते. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराविरुद्ध त्यांच्या तीव्र भावना होत्या.
  • सरकार मराठा समाजाला न्याय कधी देणार की सत्तेसाठी केवळ वापर करून घेणार, अशी विचार णा त्यांच्यातून होत होती.
  • मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ
  • आंदोलनाच्या निमित्ताने कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, ठाकरे गट शिवसेना, स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
  • त्यांनी मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ बांधली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धारही या सर्वांनी केला.
  • हाती झेंडा अन्…
  • शिवाजी पेठेतील शाहीर मिलिंद सावंत एका हाता त भगवा झेंडा, तर दुसऱ्या हातात कोल्हापुरी पायताण घेऊन सहभागी झाले होते.
  • सरकारविरूद्ध त्यांनी रोष व्यक्त करत समाजातील शासकीय, निमशासकीय, निवृत्तीवेतनधारक,आर्थि कदृष्ट्या सधन असणाऱ्यांनी उद्या (ता. ५) दसरा चौकातून निघणाऱ्या फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
  • रुग्णवाहिकेस दिला मार्ग
  • आंदोलनात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चौकात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. चौकाच्या दिशेने व्हिनस कॉर्नरकडून येणारी वाहने काही वेळ कोंडाओळच्या दिशेने वळवण्यात आली.
  • यादरम्यान सीपीआरच्या दिशेने चौकातून जाणाऱ्या रुग्णवाहिकेस मराठा बांधवांनी तत्काळ मार्ग मोकळा करून दिला.
  • शहरातील प्राथमिक शाळांना आज सुटी
  • सकल मराठा समाजाने कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थी वाहतुकीची व्यवस्था बंद राहण्याची शक्यता आहे.
  • त्यामुळे विद्यार्थी हिताचा विचार करून कोल्हापूर महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व प्राथमिक शाळांना आज (ता.५) सुटी जाहीर करण्यात आली आहे.
  • त्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी परिपत्रक काढून शाळांना सूचना दिल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा