शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- दि ५ सप्टेंबर २०२३
शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी ( धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. - यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
- यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांना पुष्प चक्र अर्पण करून मानवंदना दिली.
- शहीद दिलीप बाळासाहेब ओझरकर यांचे वडील बाळासाहेब ओझरकर आणि लहान मुलगा यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.
- यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, सुनील कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर राजेश गायकवाड (नि.)उपसंचालक लेफ्टनंट कर्नल आर.आर.जाधव (नि.) , जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनं ट कर्नल एस. डी. संगे (नि.),लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
- कारगिल येथे देशसेवा बजावत असतात ३ सप्टेंबर रोजी दिलीप ओझरकर शहीद झाले होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space