शनिवारी पिंपरी चिंचवड शहर बंद, जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- दि.६ सप्टेंबर २०२३ जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विविध मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या वर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी चिंचवड बंद ठेवण्यात येणार आहे.
- सर्व कंपन्या, कारखाने, शासकीय सेवा, शाळा महाविद्यालय, शहरातील व्यापारी यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
- पिंपरीगाव ते आंबेडकर चौक दरम्यान काढण्यात येणार आहे. बंद मधून अत्यावश्यक सेवा वगवण्यात आले आहेत.
- गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणा च्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने विविध आंदोल ने करत आहे. लाखोंच्या संख्येने शांततेत निघाले ल्या ५८ मूक मोर्चा महाराष्ट्राने व जगाने पाहिले आहेत.
- या मागणीसाठी आजवर ४२ च्या वर तरुणांनी आत्मबलिदान केले आहे; परंतु ही न्याय्यी मागणी आजवर कोणीही सरकार पुर्ण करू शकले नाही.
- मराठा समाजाला कोणावरही अन्याय न करता कोर्टात टिकणारे आरक्षण ओ.बी.सी प्रवर्गातून हवे आहे.
- जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील व सहकारी संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेत आंदोलन करत होते.
- त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो माता भगिनी, लहान मुले, जेष्ठ नागरिक,व तरुण वर्ग उपस्थित होते.
- हे आंदोलन आंदोलन उधळून लावण्याचे राज्य सर कारने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून अमानुष पणे लाठी हल्ला केला. अश्रुधारा सोडला हवेत गोळीबार केला.
- यामध्ये शेकडो माता भगिनी, लहान मुले , व ज्येष्ठ नागरिक आंदोलक जखमी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
- यावेळी गौतम चाबुकस्वार ,प्रकाश जाधव, सतीश काळे,कैलास कदम, सचिन चिखले, धनाजी येळक र, सचिन भोसले, काशिनाथ नखाते ,प्रवीण कदम, जितू दादा पवार , नकुल भोईर ,जीवन बोराटे, मनोज गायकवाड, लक्ष्मण रानवडे ,गणेश सरकटे, सुनीता शिंदे, संदीप नवसुपे ,अभिषेक म्हस्के, जाधव उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space