नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , बारलोणीच्या सेंद्रिय शेतीची आसाम अन् गुजरातकडून दखल, चार नव्या सेंद्रिय प्रक्रियांचे यशस्वी संशोधन. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

बारलोणीच्या सेंद्रिय शेतीची आसाम अन् गुजरातकडून दखल, चार नव्या सेंद्रिय प्रक्रियांचे यशस्वी संशोधन.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : फारुख मुलानी :- स्वतःच्या शेतात एक ड्रम थेअरी, स्वदेशी मल्चिंग, फळ टॉनिक, सफरचंद लागवड, विषमुक्त धान्य व भाज्यांची विक्री यासारखे अनेक प्रयोग करणारे बारलोणी (ता.माढा) येथील शेतकरी खुशालचंद मोरे यांच्या सेंद्रिय शेती प्रयोगाची दखल आसाम, गुजरात राज्यात घेतली गेली आहे.
  • त्यांनी नव्या चार सेंद्रिय प्रक्रियांचे संशोधन केले आहे. खुशाल मोरे यांची स्वतःची चार एकर शेती आहे. ही जमीन विकत घेतली तेव्हा ती पडीक होती.
  • मुरमाड जमिनीवर त्यांनी सुरवातीपासून सेंद्रिय पद्ध तीने काम करण्यास सुरवात केली. त्यांनी गाईच्या मदतीने या शेतीत अनेक प्रयोग सुरु केले.
  • त्यांनी पारंपरिक खत न वापरता एक ड्रम थेअरीचा प्रयोग सुरू केला. गोमूत्र पासून कीटकनाशक बनवणे, शेणाच्या मदतीने त्यांनी एकाच ड्रममध्ये खत तयार करुन ते वापरले.
  • मल्चिंगचे प्लास्टिक कापड वापरण्याऐवजी त्यांनी स्वदेशी मल्चिंग म्हणजे उसाचे पाचट, काडीकचरा हा मल्चिंग पेपरप्रमाणे पसरवून त्याचा वापर केला.
  • त्यामुळे जमिनीच्या आतील गांडूळ व जिवाणूला कोणतेही नुकसान झाले नाही. शेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन त्यांनी काटेकोरपणे करत ठिबकचा वापर केला आहे.
  • त्यांच्या या कामगिरीची दखल गुजरात व आसाम येथील संस्थांनी घेतली.तेजसपूर विद्यापीठ व लोक प्रतिनिधींनी त्यांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग समजून घेत त्यांचे कौतुक केले आहे.
  • सर्व प्रकारची धान्ये, भाजीपाला व फळांची विक्री ते स्वतः विषमुक्त उत्पादने नावाने करतात. याच पद्धतीने त्यांनी फळ टॉनिक नावाचे टॉनिक तयार केले.
  • खताच्या दुकानात झाडांच्या वाढीसाठी जी संप्रेरके मिळतात त्याप्रमाणे त्यांनी केळी, पपई व गूळ वापरून फळ टॉनिक तयार करुन त्याचा वापर केला.
  • कुटुंबीयांना शेतातीलच फळे खायला मिळावीत म्हणून हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची रोपे मागवून ती लावली.
  • या झाडामुळे सेंद्रिय सफरचंदे घरीच खायला मिळ तात. श्री.मोरेंची सेंद्रिय शेती इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
  • ठळक बाबी
  • पडीक जमिनीचे सुपीक जमिनीत रूपांतर
  • एक ड्रम थेअरी, फळ टॉनिकची निर्मिती
  • चार गाईंचे पालन
  • काडी कचऱ्याचा मल्चिंगसाठी वापर
  • गोमाता विषमुक्त उत्पादने नावाने केला ब्रॅण्ड
  • पाऊण एकरात ४५ टन उसाचा उतारा
  • वर्षाकाठी पाच लाखापेक्षा अधिक उत्पन्न
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा