नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , पावसासाठी विद्यार्थ्यांचे श्री.कीर्तेश्वराला साकडे. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

पावसासाठी विद्यार्थ्यांचे श्री.कीर्तेश्वराला साकडे.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : धनंजय गोफने :- येथील नेताजी सुभाष विद्यालय व उच्च महाविद्यालया च्या ८०० ते ९०० विद्यार्थी विद्यार्थिनींनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून केत्तूर नंबर १ येथील प्राचीन कीर्तेश्वर मंदिराला बुधवार (ता.६) रोजी भेट देऊन महादेवाचे दर्शन घेतले.
  • यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरात अद्यापही मोठा पाऊ स झाला नाही त्यातच उजनी धरणही पूर्ण क्षमतेने भरलेले नाही, त्यामुळे राहिलेल्या पावसाळ्यात तरी भरपूर पाऊस पडू दे ! उजनीच्या जलाशय पूर्ण क्षमतेने भरू दे ! असे साकडे महादेवाला (कीर्तेश्वर) साकडे घातले.
  • केत्तूर नं.१ येथे उजनी जलाशयाकाठी प्राचीन महा देव किर्तेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली उजनीचे अथांग पाणी असल्याने परिसर नयनरम्य आहे.
  • येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णो द्धार करण्याचे काम हाती घेतले आहे. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर पावसा साठी प्रार्थना केली.
  • या उपक्रमाचे संयोजन प्राचार्य दिलावर मुलाणी व पर्यवेक्षक भीमराव बुरटे यांनी केले होते.
  • उपक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर जाधवर, राम चंद्र मदने, सुभाष सामंत,आत्माराम साबळे, गणेश कोळी, वंतेश कडवे, संदीप हिरवे यांनी परिश्रम घेतले.
  • विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी या हेतूने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
  • तालुक्यात पावसाची स्थिती गंभीरच
  • पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पाव साने समाधानकारक हजेरी लावलेली नाही.जिल्ह्या साठी वरदायिनी असणारे उजनी धरण यंदा अजून ही वजा पातळीतच आहे.
  • त्यामुळे या चिमुकल्यांनी थेट देवालाच साकडे घालण्यासाठी कीर्तेश्‍वरचे मंदिर गाठले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा