नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी केले अभिवादन – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

श्री संत भगवान बाबा पुण्यतिथी निमित्त नागरिकांनी केले अभिवादन

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर: ज्ञानदेव गांडुळे वडू खुर्द पुणे।

राष्ट्रसंत, परमपूज्य, वैराग्यमूर्ति ह.भ.प. भगवान बाबा याना पुण्यतिथी निमित्त  सदगुरू नगर वडू खुर्द मधील सर्व नागरिकांकडून अभिवादन करण्यात आले.

आज बागवान बाबा यांची पुण्यतिथी लोक मोठ्या उत्सव साजरी करतात त्या निमित्ताने अनेक समाज बांधव एकत्र येतात

नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : 29 जुलै, इ.स. 1896 मृत्यू : 18 जानेवारी, इ.स. 65) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायतील संत आहेत।

राष्ट्रसंत भगवानबानी महाराष्ट्राच च्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक, नैतिक और सांस्कृतिक प्रबोधन केले। 

आळंदीवरून नारायणगडावर भगवानबाबा परत आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील भाविक येऊ लागले. त्याच सुमारास बंकटस्वामींच्या कीर्तन प्रसारासाठी वार्ता कानी पडल्याने त्यांनी प्रभावित होऊन समाजप्रबोधन करण्याचा निश्चय केला. भगवानबाबा भाविकांच्या आग्रहास्तव कीर्तन करू लागले.

इ.स.१९१८ साली त्यांनी नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी चालू केली. तेव्हापासून नारायणगडाला ‘धाकटी पंढरी’ म्हणतात. इ.स.१९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. पुढे सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह सुरू केले. सप्ताहात भजन, कीर्तन, प्रवचन, कथाकथन, हरिनामजप व गाथापारायणे होत. पहिला अखंड हरिनाम सप्ताह इ.स.१९३४ साली पखालडोह या ठिकाणी केला. भगवानबाबा नारायणगडावर असेपर्यंत १७ हरिनाम सप्ताह झाले.

भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे माणिकबाबा आजारी असल्याची बातमी भगवानबाबांना कळली तसे ताबडतोब ते नारायणगडावर आले. माणिकबाबांनी हात उंचावून भगवानबाबांना जवळ बोलवले. ‘भगवान, तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील’ असे सांगितले. ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, (इ.स. १९३७) रोजी माणिकबाबांनी आपला देह ठेवला.

भगवानबाबांवर लोभाचा आळ घेतल्यावर त्यांनी नारायणगड सोडला. खरवंडी येथील बाजीराव पाटील भगवानबाबांना धौम्यगडावर घेऊन गेले. भगवानबाबांनी आसपासच्या गावात जाऊन लोकांना वारकरी संप्रदायाकडे वळविले गड उभारणीचे काम सुरू झाले, बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यांसाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावरून पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चिऱ्यांचे रूप दिले गेले. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीच्या गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.

अशा संत रुपी बाबांना पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन……..                                                       सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

 

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा