राजकीय वर्तुळात खळबळ….! संतप्त पदाधिकाऱ्यांनी BJP कार्यालयच केलं बंद.
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : संदीप कारके :- जिल्ह्यातील नेतेमंड ळींनी केलेल्या खांदेपालटावर आजरा तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये जुन्या व नव्या पदाधिका ऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
- अनेक वर्षांपासून पक्षात सुरु असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत जिल्हा पातळीवरील नेत्यांना टार्गेट केले.
- आजऱ्यातील भाजपचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील नेतेमंडळींकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत कार्या लयाचा फलक उतरवला.
- यामुळे पक्षात दुफळी पडल्याचे स्पष्ट झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तालुका पातळीवरील पदाधिकारी बदलासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु होत्या.
- खांदेपालट कसा होणार यावर भाजपमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. जिल्ह्यातील वरिष्ठ नेतेमंडळींनी खांदेपालट केली. याचे पडसाद दोन दिवसांत तालुक्यात उमटले आहेत.
- याबाबत गुरुवारी (ता. ७) पक्षातील जुन्या पदाधि काऱ्यांनी बैठक घेतली व नेतेमंडळींच्या निर्णया बाबत नाराजी व्यक्त केली.
- स्थानिक जुन्या जाणत्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मते विचारात न घेता बदल केल्याचा आरोप त्यांनी केला.
- बदलामध्ये जुन्या निष्ठावंत कार्यक र्त्यांना डावल ल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. जुने पदा धिकारी आज आजरा -गडहिंग्लज मार्गावरील भाज पच्या तालुका कार्यालयात जमले.
- त्यांनी भाजपच्या कार्यालयाचा नामफलक उतरव ला. कार्यालय बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. लवकरच याबाबत मेळावा घेऊन पुढील दिशा ठरव णार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
- यावेळी प्रा. सुधीर मुंज, अरुण देसाई, नाथा देसाई, सचिन इंदलकर, महेश नार्वेकर, हर्षद परुळेकर भा स्कर बुरुड, गुरु टोपले, अभिजित रांगणेकर, संज य सांबरेकर, मारुती गुरव यांच्यासह शहर व तालु क्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space