पाचल – जवळेथर रस्ता खड्डेमय तातडीने दुरुस्ती करण्याची प्रवाशांची मागणी.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील पाच ल -जवळेथरदरम्यानच्या मूर सुतारवाडी ते तळवडे, ताम्हा णे फाटा,हा ७ किमी लांबीचा रस्ता खड्ड्याने व्यापल्याने या रस्त्यावरुन वाहतूक करणे अत्यंत कठीण बनले आहे.
  • याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सातत्याने सांगू नही कोणती उपाययोजना करण्यात आलेली नाही.
  • या रस्त्याच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष व सातत्याने प डणारा मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत.
  • या रस्त्यावरील मोऱ्यांची अवस्थाही दयनीय आहे. रस्त्या च्या साईड पट्ट्या गायब झाल्या आहेत. या रस्त्या वरुन वाहतूक करणारे वाहनचालक व नागरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
  • एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण..? या रस्त्याचा वापर १५ ते २० गावातील ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी व कर्मचारी करतात.
  • रायपाटण ग्रामीण रुग्णालय,खापणे महाविद्यालय अनेक शिक्षण संस्था व पाचल बाजारपेठ यामुळे या रस्त्यावर वा हनांची तसेच पादचाऱ्यांची कायम वर्दळ असते.
  • मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभा गाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने रस्ता वाहतूक योग्य राहीला नाही.
  • सध्या या रस्त्यावरील प्रवास जीवघेणा ठरत असून सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles