नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , जिल्ह्यात कोविडमुळे निराधार झालेली बालके आणि महिला यांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ द्यावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे संबधित विभागाना निर्देश. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

जिल्ह्यात कोविडमुळे निराधार झालेली बालके आणि महिला यांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ द्यावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे संबधित विभागाना निर्देश.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊

रिपोर्टर:- सचिन ना. कोयरे: यवतमाळ जिल्ह्यात कोविडमुळे निराधार झालेली बालके आणि महिला यांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित विभागांना दिले. कोविडमुळे पालक दगावलेल्या बालकांच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेला जिल्हा कृती दल, जिल्हा बाल संरक्षण समिती, सखी वन स्टॉप सेंटर व सर्व समावेशक विषय समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेत महसूल भवन येथे पार पडली.                                                                                                                                     जिल्ह्यात महिला व बाल विकास विभागाकडे दोन्ही पालक दगावलेले १४ व ५१६ एक पालक दगावलेल्या बालकांची नोंदणी झालेली आहे.जिल्ह्यातील ५३० यापैकी ४८९ बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच ३१३ बालकांना बाल न्याय निधीअंतर्गत शैक्षणिक मदत जिल्हा बाल संरक्षण क क्षाद्वारे करण्यात आली. कोविडमुळे निराधार झालेल्या महिला व बालक यांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ द्यावा तसेच बालकांचे कायदे व योजना याविषयी अधिकाधिक जनजागृती करण्यात यावी. जास्त पटसंख्या असलेल्या शाळा, शिक्षक व पालकवर्गासाठी बालकांच्या समस्या,उपाययोजना व असलेल्या व्यवस्था याविषयी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम महिला बाल विकासद्वारे आयोजित करावे. गावपातळीवरील व प्रभाग पातळीवरील बाल संरक्षण समित्या गठीत करून त्यामार्फत बालकांचे विषय संवेदनशीलपणे हाताळण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.                                                                                 बैठकी करिताजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कड्ड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नीलेश लीचडे, कौशल्य विकास रोजगार सहआयुक्त विद्या शितोळे,बाल कल्याण समिती अध्यक्ष वासुदेव डायरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मिनल जगताप, जिल्हा संरक्षण अधिकारी रूपाली पांडे, विधी अधिकारी संध्या वानखडे, समाज कल्याण विभाग प्रतिनिधी मीनाक्षी मोटघरे, उपशिक्षणाधिकारी राजू मडावी, प्रदीप गोडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे प्रदीप शेंडे, चाइल्ड लाइन केंद्र समन्वयक फाल्गुन पालकर, नगरपरिषदेचे के. बी. शर्मा, सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी आगाशे तसेच महिला व बाल विकास विभागाचे महेश हळदे,स्वप्नील शेटे,अतुल सहारे, सुप्रिया रोकडे, श्वेता लिचडे, मयुरी प्रांजळे,वैशाली भुसे आदी उपस्थित होते.                                                  सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा  https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा