नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , चांदवड तालुक्यातील शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करा प्रांताधिकारी यांना अनेक कार्यकर्त्यांचे निवेदन देऊन सूचना. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

चांदवड तालुक्यातील शासकीय कार्यालयात २८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करा प्रांताधिकारी यांना अनेक कार्यकर्त्यांचे निवेदन देऊन सूचना.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ (आर के मामा):- माहिती अधिकार अधिनियम २००५ या कायद्याची निर्मिती होऊन १८ वर्ष पूर्ण झाली.
  • परंतु अजून पर्यंत या माहिती अधिकार कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात आलेली नाही अशी वस्तुस्थिती निदर्शनास येत आहे.
  • ही बाब खेदजनक असून माहिती अधिकार कायद्या ची कठोरपणे अंमलबजावणी होऊन नागरिकांमध्ये जनजागृती प्रचार प्रसार करावा आणि हा आंतररा ष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करताना प्रशास कीय अधिकाऱ्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी पार पाडण्याचे भान ठेवून शासन निर्णय केमाअ २००८/पत्र क्र.३७८/०८/सहा/सामान्य प्रशासन विभाग मुंबई-३२, दि. २८ सप्टेंबर २००८ नुसार शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे.
  • प्रशासनातील पारदर्शकतेसाठी माहिती अधिकार अधिनियम २००५ हा कायदा निर्मित करण्यात आलेला असून या कायद्याची सर्वसामान्यांना माहिती व्हावी हा शासनाचा उद्देश आहे. त्याप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही करावी.
  • आज पर्यंत शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून या माहिती अधिकार कायद्याची परिपूर्ण अंमलबजा वणी करण्यात येत नसून या कायद्याची प्रचार प्रसार प्रसिद्धी देखील करण्यात येत नाही.
  • तसेच माहिती अधिकार अर्जाच्या अनुषंगाने माहि ती प्राप्त करून देताना काम चुकार प्रशासन अधि कारी सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून विहित नियमांचे उल्लंघन करून नियमबाह्य कामकाज करतात. ही बाब शासनाच्या देखील निदर्शनास आलेली आहे.
  • त्यामुळे राज्य शासनाने वेळोवेळी शासन निर्णय देखील पारित करून या माहिती अधिकार कायद्या ची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असे संबंधित प्रशासन अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत मात्र अद्याप आपल्या सर्वसामान्य जनतेचे दुर्दैव फलित झालेले नाही.
  • कायद्याची निर्मिती होऊन १८ वर्ष पूर्ण झालेली आहे तरी काटेकोरपणे अंमलबजावणी का केली जात नाही.?
  • असा प्रश्न उपस्थित झाल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्था पक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर यांच्या प्रेरणेने प्रेरित झालेले नाशिक जिल्ह्यातील माहिती अधिका र कार्यकर्ता महासंघ जागृत झालेला आहे.
  • या संघाच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जिल्हाभर विविध शासकीय कार्यालयांकडे २८ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करून माहिती अधिकार कायद्याची प्रचार प्रसार जनजागृती करावी.
  • याकरिता तालुक्यातील विविध संघटनेच्या माध्यमा तून सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यक र्ते यांनी निवेदने दाखल केलेले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा