
विठुरायाच्या नामस्मरणाने दुमदुमली शाळा; विद्यार्थ्यांनी फुगडी, गोल रिंगणातून साजरी केली आषाढी एकादशी.
- प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- पी.ई.एस.एस.मॉडर्न प्री -प्रायमरी आणि प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूल, यमुनान गर, निगडी येथे दि .५जुलै २०२५ शनिवार रोजी आषाढी एकादशी पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
- मुलांना आपल्या संस्कृतीचे व परंपरेचे महत्व कळावे म्हणू न ही संकल्पना संस्थेचे सेक्रेटरी,आणि शाळेचे चेअरमन प्रो.शामकांत देशमुख व श्री.यशवंत कुलकर्णी यांनी सुच विली.
- महाराष्ट्राचे लाडके दैवत विठ्ठल.शाळेमध्ये आषाढी एकाद शीच्या निमित्ताने विठ्ठल व रखुमाईचे पूजन व आरती करण्यात आली.
- तसेच या निमित्ताने शाळेमध्ये पालखी आणि तुळशी वृंदा वन बनविणे या स्पर्धा घेण्यात आल्या.
- या कार्यक्रमामध्ये नर्सरी ते इयत्ता ४ थी पर्यंतचे विद्यार्थी विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानदेव ,मुक्ताई इ. वेष भूषा परिधान करून सहभागी झाले होते.
- विठ्ठल, विठ्ठल, ज्ञानोबा माऊलीच्या गजरात मुलांनी पाल खी सोबत पायी वारीचा आनंद अनुभवला. चिमूकले बाल गोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला होता.
- हा दिंडी सोहळा टाळ-मृदुंगाच्या गजरात उत्साहात साज रा करण्यात आला.
- शाळेचे व्हिजिटर डॉ.प्रो.अतुल फाटक, डॉ.प्रो.शशिकांत ढोले,आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.तृप्ती वंजारे ह्यां च्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला.
- नविन तंत्रज्ञानाची कास धरत मुलांना स्मार्ट क्लास द्वारे आषाढी एकादशीचे महत्व सांगितले.सौ.नमिता घोलप व सौ.ज्ञाती चौधरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
- संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे सर सहसचिव सौ. ज्योस्त्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रो.डॉ.निवेदिता एकबोटे यांनी मुलांचे कौतुक केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/