
जि.प.पू.प्रा.केंद्र शाळा ओझर नं १ मध्ये मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जिल्हा परिषद पू र्ण प्राथमिक केंद्रशाळा ओझर नं.१मध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक चुरशीच्या वातावरणात संपन्न झाली.
- लोकशाही पद्धतीने निवडणूक कार्यवाही करण्यात आली. उमेदवार अर्ज दाखल करणे व डिपॉजिट जमा करणे,अर्ज छाननी करणे, अर्ज मागे घेणे, प्रचार कार्यक्रम राबविणे व प्रत्यक्ष मत पत्रिकेद्वारे मतदान करणे.

- या सर्व गोष्टी अगदी उत्साहाच्या वातावरणात पार पड ल्या. दि. १६ जून पासून सुरु झालेली रणधुमाळी २५ जूनला संपली.
- मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, आरोग्य मंत्री, पाणी व स्वच्छ ता मंत्री, धान्य व भोजन मंत्री, क्रीडा मंत्री, वाचनालय मं त्री, टोल मंत्री अश्या विविध खात्यासाठी निवडणूक प्रक्रि या राबविण्यात आली.
- यामध्ये कु.पूर्वी गोसावी (मुख्यमंत्री), कु.दुर्वा गुरव (उपमु ख्यमंत्री), कु.प्रेम हातणकर (सांस्कृतिक मंत्री ), कु.कोमल पळसमकर (आरोग्य मंत्री ),कु.भूषण रेगे (धान्य व भोजन मंत्री ), कु.स्वरूप ओझरकर (वाचनालय मंत्री ), कु.सान्वी गुरव (क्रीडा मंत्री ), कु.कार्तिक रांबाडे (टोल मंत्री ), कु. पा रस कुर्ले (पाणी व स्वच्छता मंत्री ) यांनी बाजी मारली.
- या सर्व मंत्र्यांना *दि. २६ जून लोकराजा छत्रपती शाहू म हाराज यांची जयंती अर्थात सामाजिक न्याय दिनादिवशी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

- श्री. रामचंद्र मोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्य पार पाडले तर श्री.शैलेंद्र बंदसोडे, श्री.संजय चौगले, श्री. दत्ता गायकवाड यांनी मतदान अधिकारी ही भूमिका पार पाडली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











