
संभाजीनगर अपहरण प्रकरण : काका-पुतण्याने दीड कोटी रुपये खंडणीसाठी रचला 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा कट, 2 जणांना अटक, मुख्य सूत्रधारासह दोघे पसार.
- प्रतिनिधी : छ.संभाजीनगर : संदीप कारके :- झटपट श्रीमंत होण्यासाठी काका-पुतण्याने मिळून गावातीलच ध नाढ्य व्यक्तीच्या मुलीच्या अपहरणाचा कट रचल्याचे पो लिस तपासात उघड झाले.
- अपहरण करून दीड कोटीची खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. मात्र नागरिक व ११ वर्षीय मुलीने प्रसंगावधान राखून केलेल्या प्रतिकारामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला.

- याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. नाथ प्रांगण येथील खासगी क्लासेसच्या आवारातून बुधवारी (१६ जुलै) सायं काळी सातच्या सुमारास प्रियाचे (नाव बदलले आहे) अप हरण करण्यात आले.
- मात्र, क्लासहून तिला घरी नेणाऱ्या वाहनाच्या चालकाने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी नाग रिक सतर्क झाले.
- त्यामुळे त्यांनी प्रियाला गाडीतून खाली उतरवले. या प्रकर णात आरोपी बाळासाहेब अशोक मोरे (३८,रा. विठ्ठलवा डी, ता.अंबड, जि. जालना) व संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (३५, रा.जामखेड, ता.अंबड, जि. जालना) यांना रा त्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.
- त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पुंडलिक नगर ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
- वॉशिंग सेंटरच्या पावतीवरून काढला माग अपहरणाचा डाव फसल्यानंतर गाडीतील चार आरोपींनी दोघांचे गट करून वेगवेगळ्या ठिकाणी पळ काढला.
- या अपहरणासाठी त्यांनी १५ दिवसांपूर्वी चारचाकी कार ची खरेदी केली होती. ती तेथेच सोडावी लागल्याने पोलि सांकडे गाडीची संपूर्ण माहिती समोर आली.
- गाडीच्या आत वॉशिंग सेंटरची पावती मिळाली. त्यावर गणेश मोरे याचे नाव होते. गाडीच्या आत वेगवेगळ्या नंबर प्लेट सापडल्या.
- चेसिस नंबरच्या आधारे पोलिस गाडीच्या मूळ मालका पर्यंत पोहोचले. ही गाडी मूळ मालकाने १५ ते २० दिवसां आधी अंबड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील काही जणां ना विकल्याचे समोर आले.
- अंबड-पाचोड रोडवर हॉटेलमध्ये जेवताना पकडले आरो पींची नावे समोर आल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथका ने तांत्रिक बाबींच्या आधारे त्यांचा शोध घेतला.
- त्यांना अंबड-पाचोड रोडवरील पिंपरखेड येथे एका हॉटेल मध्ये आरोपी जेवण करत असल्याची माहिती मिळाली.
- त्या ठिकाणी गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक प्रवीण वाघ यां च्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशीत त्यांनी अन्य २ साथीदारांची माहिती दिली असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.
- मुलीच्या धिटाईमुळे अपहरणकर्तेही गडबडले, रस्त्यात गा डीतून उतरवले क्लास संपवून प्रिया घरी निघाली होती. नेहमीच्या वाहनात बसण्यापूर्वीच चार धडधाकट तरुण अचानक समोर आले.
- त्यांनी तिला कारमध्ये अक्षरशः कोंबले. त्यावेळी तिने अप हरणकर्त्यांचा प्रतिकार केला. त्यांना बोचकारले, चावा घेत ला. ‘मला कुठं नेता?’ असे तिने विचारले.
- त्यावर, ‘तुझ्या वडिलांकडे…,’ असे उत्तर अपहरणकर्त्यांनी दिले. मग तिने न घाबरता ‘वडिलांचं नाव सांगा’ असा प्रति प्रश्न केला.
- मुलीची धिटाई पाहून अपहरणकर्तेही गडबडून गेले.लोकां नी गाडीवर दगडफेक करताच तिला रस्त्यातच उतरवून दिले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











