नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , सोलापूर जिल्ह्यात ८ महिन्यातच तब्बल ८८० कोटींची १.७२ कोटी लिटर मद्यविक्री; कारवाईत पकडलेली दारू ७० कोटींहून अधिक रूपयांची – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

सोलापूर जिल्ह्यात ८ महिन्यातच तब्बल ८८० कोटींची १.७२ कोटी लिटर मद्यविक्री; कारवाईत पकडलेली दारू ७० कोटींहून अधिक रूपयांची

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : भारत साळुंके :- मागणीअभावी गायीच्या दुधाचे दर प्रतिलिटर २५ ते २७ रुपयांपर्यंत घसरले असून विक्री देखील वाढलेली नाही.
  • दुसरीकडे बिअर, विदेशी दारू व वाईनच्या किमती ३५० ते ७५० रुपये लिटरपर्यंत असतानाही गतवर्षीच्या तुलने त विक्रीत तब्बल साडेसहा ते साडेदहा टक्क्यांनी मद्य विक्रीत वाढ झाल्याची वस्तुस्थिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील आकडेवारीतून समोर आली आहे.
  • एकट्या सोलापूर जिल्ह्यात आठ महिन्यात तब्बल ८८० कोटींची मद्यविक्री झाली आहे.
  • सोलापूर जिल्ह्यात एप्रि ल ते नोव्हेंबर या आठ महिन्या त तब्बल पावणेदोन को टी लिटर दारूची अधिकृत वि क्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाकडे झाली आहे.
  • १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या वर्षभरात मद्य विक्रीसह अन्य बाबींमधून राज्य उत्पादन शुल्कच्या सोलापूर कार्यालयाला १६६ कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट आहे.
  • त्यातील आठ महिन्यात जवळपास ८० कोटींचा महसू ल मिळाला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनधिकृत हातभट्ट्यांवर छापे टाकून राज्य उत्पादन शुल्क विभागा ने अंदाजे ६० कोटींहून अधिक रुपयांची हातभट्टी दारू व गुळमिश्रित रसायन जप्त तथा नष्ट केले आहे.
  • तसेच हॉटेल, ढाब्यांवर बेकायदेशीर मद्यविक्री व विदेशी दारूची वाहतूक व विक्रीवरील कारवाई देखील कोट्य वधींची आहे.
  • ग्रामीण पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली आहे. अवघ्या आठ महिन्यात एकट्या सोलापूर जिल्ह्यातच एक हजार कोटींची मद्यविक्री होते हे यावरून स्पष्ट होते.
  • गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या काळात पावणेसहा लाख लिटर विदेशी दारूचा खप वाढला आहे.
  • तसेच साडेपाच लाख लिटर बिअर तर पाच हजार लिटर वाईनची विक्री देखील वाढल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
  • दारूचे लिटरनिहाय दर.
  • देशी दारू ४०० रुपये
  • विदेशी दारू ७४० रुपये
  • बिअर ३५० रुपये
  • दुधाचे लिटर निहाय दर.
  • म्हशीचे दूध ४२ ते ४७ रुपये
  • गायीचे दूध २५ ते २७ रुपये
  • दररोजचे सरासरी उत्पादन २१ लाख लिटरपर्यंत
  • सोलापुरातील ८ महिन्यातील मद्यविक्री
  • दारू विक्री अंदाजे किंमत
  • देशी ६०,७१,१७२ लिटर २४२.८५ कोटी
  • विदेशी ६१,२३,१३८ लिटर ४५९.२३ कोटी
  • बिअर ४९,०७,२६९ लिटर १७१.७६ कोटी
  • वाइन ८०,४२८ लिटर ६.५० कोटी
  • एकूण १,७१,८२,००७ लिटर ८८०.३४ कोटी
  • बिअरच्या किमतीसाठी समिती, पण दूध दरासाठी.
  • राज्यातील बिअरच्या किमती पाच रुपयाचे कमी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमून त्याच्या कारणांचा अभ्यास केला जात आहे.
  • मात्र, अहोरात्र मेहनत करणाऱ्या बळिराजाला तथा दूध उत्पादकाला सध्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ ते २७ रुपयांचाच दर मिळतोय.
  • तरी देखील दर वाढीच्या दृष्टीने सरकार पातळीवरून काहीच अभ्यास केला जात नाही, हे दुर्दैवीच.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा