नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , रुग्णांना १२०९ आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५१ रुग्णालये या योजनेत समाविष्ट; त्यासाठी रुग्णाकडे योजनेचे गोल्डन कार्ड असायला हवे. – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

रुग्णांना १२०९ आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५१ रुग्णालये या योजनेत समाविष्ट; त्यासाठी रुग्णाकडे योजनेचे गोल्डन कार्ड असायला हवे.

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : पुनम जाधव :- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत) व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून शासकीय नोकर दारांसह शुभ्र, केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारक कुटुंबांतील सदस्यांनाही पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • रुग्णांना १२०९ आजारांवर मोफत उपचार मिळावेत, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ५१ रुग्णालये या योजने त समाविष्ट आहेत.
  • त्यासाठी रुग्णाकडे योजनेचे गोल्डन कार्ड असायला हवे. त्यासाठी गावागावी सोय करण्यात आली आहे.
  • जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मु ख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सात त्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन ३१ डिसें बरपूर्वी जनआरोग्य योजनेतील सर्व लाभार्थींचे गोल्डन कार्ड काढण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
  • त्यानुसार आशासेविकांसह आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी आणि जिल्ह्यातील १८ हजार महिला बचत गट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापी ठाशी सलंग्नित महाविद्यालये, सहकार विभागाकडील गाव पातळीवरील विकास कार्यकारी सोसायट्यांचे स चिव, रेशन दुकानदार व शाळांमधील शिक्षकांच्या माध्य मातून हे कार्ड काढून दिले जात आहेत.
  • त्याशिवाय गावागावातील ऑनलाइन सुविधा केंद्रांवरून ही हे कार्ड काढता येणार आहे.
  • तसेच लाभार्थीला स्वत:लाही त्यांच्या मोबाईलवरून हे कार्ड काढता येणार आहे. कार्ड नसलेल्या रुग्णांना तुर्तास उपचार मोफत घेण्यासाठी त्यांच्याकडे आधार कार्ड, केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड आवश्यक आहे.
  • ‘गोल्डनकार्ड’साठी गावागावांमध्ये सोय
  • जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील २३ लाख ४७ हजार ५५५ लाभार्थींना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड काढून दिले जात आहे.
  • लाभार्थी स्वत:ही कार्ड काढू शकतो. योजनेतील कोण त्याही रूग्णालयात हे कार्ड दाखविल्यानंतर त्या रुग्णा ला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतील.
  • डॉ.माधव जोशी, वरिष्ठ जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सोलापूर
  • सोलापुरातील मोफत उपचाराची ५१ रुग्णालये…
  • सोलापूर : डॉ. चिडगुपकर हॉस्पिटल, डॉ. कासलीवाल हॉस्पिटल, श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रू ग्णालय, गंगामाई हॉस्पिटल, श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पि टल, अश्विनी ग्रामीण रूग्णालय, सोलापूर कॅन्सर सेंटर, ह्दयम हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, युगंधर मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल, नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पि टल, श्री मार्कंडेय हॉस्पिटल, डॉ.रघोजी किडनी हॉस्पि टल ॲण्ड रिसर्च सेंटर.
  • पंढरपूर : उपजिल्हा रूग्णालय, सेवा हॉस्पिटल, लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री गणपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, नवजीवन शिशू हॉस्पिटल, पंढरपूर सुपरस्पेशालिटी ॲण्ड गॅलॅक्सी मल्टिस्पेशालि टी हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, चिरायू हॉस्पिटल, चिरंजीव हॉस्पिटल, अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल, वरद विनायक हॉस्पिटल.
  • बार्शी : सुविधा आयसीयू ॲण्ड कॅथलॅब सेंटर, जगदाळे मामा हॉस्पिटल, कल्याणरावजी भातलवंडे बालरूग्णा लय आयसीयू सेंटर, अश्विनी रूरल कॅन्सर रिसर्च ॲण्ड रिलिफ सोसायटी, ग्रामीण रूग्णालय, सुश्रूत हॉस्पिटल.
  • सांगोला : वेदांत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. लवटे ऑर्थो. हॉस्पिटल ॲण्ड ट्रॉमा सेंटर, दक्षता मल्टिस्पेशा लिटी हॉस्पिटल, श्रीनंद हॉस्पिटल, महूद मल्टिस्पेशा लिटी हॉस्पिटल, सदगुरू हॉस्पिटल.
  • माढा : पाटील हॉस्पिटल, टेंभुर्णी, मित्रप्रेम हॉस्पिटल (माढा).
  • माळशिरस : देवडीकर मेडिकल सेंटर (अकलूज), अक लूज क्रिटिकल केअर ॲण्ड ट्रॉमा सेंटर, सूर्यवंशी ट्रॉमा ॲण्ड रिहॅबिटेशन सेंटर, कदम मल्टिस्पेशालिटी हॉस्पि टल अकलूज, युनिटी हॉस्पिटल, नातेपुते.
  • मोहोळ : ग्रामीण रूग्णालय.
  • करमाळा : समर्थ बालरुग्णालय व उपजिल्हा रूग्णालय करमाळा
  • मंगळवेढा : महिला हॉस्पिटल, दामाजी मल्टिस्पेशालि टी हॉस्पिटल, शिर्के मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, गजा नन लोकसेवा हॉस्पिटल.
  • सोलापुरातील जनआरोग्य योजनेची स्थिती
  • एकूण लोकसंख्या ४७,६१,१७२
  • योजनेचे लाभार्थी २३,४७,५५५
  • गोल्डन कार्डधारक ६.१० लाख
  • गोल्डन कार्ड काढण्याची मुदत
  • २६ जानेवारी २०२४
  • गोल्डन कार्ड तुम्हालाही काढता येईल…
  • आधार कार्ड किंवा १२ अंकी क्रमांक असलेले रेशनकार्ड
  • चालू मोबाईल क्रमांक
  • ‘आयुष्यमान भवं’ हे ॲप्लिकेशन घेऊन त्यावर लॉगिन करून स्वत: कार्ड काढण्याचा पर्याय निवडा आणि माहिती भरून ते सबमिट करा.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा