थंडीमुळे उबदार कपड्यांचा बाजार फुलला; गेल्यावर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली मागणी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : राजाराम खांगड :- शहर व परिसरात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे.
- शहरातील अनेक ठिकाणी उबदार कपडे विक्रीची दुका ने थाटली आहेत. गेल्यावर्षीपेक्षा उबदार कपड्यांच्या मागणीत वीस टक्क्यांनी वाढली आहे. भाव मात्र स्थिर आहेत.
- किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, सटाणा नाका, गिर णा पूल, अंजुमन चौक, आझादनगर यासह विविध भागात थंडीच्या कपड्यांची दुकाने नोव्हेंबरपासून सुरु झाली आहेत.
- गरिबांचा गुरुवारचा बाजार हक्काचा झाला आहे. या बाजारात मुंबईहून जुन्या कपड्यात स्वेटर विक्रीसाठी येत आहेत.
- जुन्या स्वेटरची हातगाड्यांवर पन्नास रुपयांना विक्री होत आहे. त्याचप्रमाणे शहरासह ग्रामीण भागात दुचा की व पिकअपमध्ये चादर, मफलर, शाल, स्वेटर विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- स्वेटर व चादरी विकण्यासाठी राजस्थानमधील व्यावसा यिक शहर व तालुक्यात दाखल झाले आहेत. गिरणा पुलावर वीस दुकाने आहेत. या दुकानांमध्ये वूलन स्वेटरची रेलचेल आहे.
- किदवाई रस्त्यावर हंगामी स्वेटर विक्रीची दुकाने असून या दुकानात मालेगाव, मुंबई, कोलकोत्ता आदी भागा तील स्वेटर येत आहेत.
- दुकानात दीडशेपासून ते तीनशे रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीस आले आहेत. स्वेटरमध्ये कॉलर, हाफ बाह्यांचे, बेल्ट, लाँग, काश्मिरी, जॅकेट, झिफर या प्रकारचे स्वेटर आहेत.
- लहान मुलांमध्ये वूलन, तर महिलांमध्ये कॉलरच्या स्वेट रची ‘क्रेझ’ आहे. किदवाई रस्त्यावर स्वेटर स्वस्तात मिळत असल्याने ‘कसमादे’ परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत.
- त्याचबरोबर बाजारात टोपी, हातमोजे, सॉक्स, मफलर आदींची शेकडो दुकाने थाटली आहेत. टोपी मुंबई येथील चकला मार्केटमधून येत आहेत.
- टोपीमध्ये फेदर, वूलन, कॉटन लाईकरा, फर कॅप यासह पंधरा प्रकार असून चाळीस ते नव्वद रुपयांपर्यंत टोपीची विक्री होत आहे.
- लहान मुलांसाठी नवीन फॅन्सी हेडफोन आले आहेत. बालगोपाल हेडफोन व फॅन्सी टोपीच्या प्रेमात पडले आहेत.
- हेडफोन चाळीस ते साठ रुपयांमध्ये विकत मिळतात. ज्येष्ठ नागरिक वूलन व कॉटनचे मफलर खरेदी करताना दिसत असल्याची माहिती मोहम्मद फैजान यांनी दिली.
- नरकोळ : बहुतांश दुकानांमध्ये फॅशनच्या मफलर आणि मखमली उबदार खरेदीचा कल दिसून येत आहे. सिल्कचे स्टॉल्स मुलींचे केंद्रबिंदू आहेत.
- कपड्यांशी ‘मॅचिंग’ होणाऱ्या उबदार कपड्यांना मागणी आहे. लोकरीच्या उबदार कपड्यांची चलती आहे. चिमु कल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध डिझाईनचे स्वेटर, जॅकेट बाजारात उपलब्ध आहेत.
- उबदार कपड्यांचे भाव रुपयांमध्ये असे : जॅकेट-पाचशे ते बाराशे, लुझर-चारशे ते आठशे, स्वेटर-पाचशे ते नऊशे, मफलर-शंभर, कानटोपी-साठ ते एकशे वीस, हातमोजे-शंभर ते दोनशे, महिलांचे स्वेटर-चारशे ते बाराशे, ट्रॅकसूट-पाचशे, छोट्या बालकांचे स्वेटर-शंभर ते साडेचारशे.
- “गेल्यावर्षी प्रमाणे स्वेटरचे भाव आहेत. स्पर्धेमुळे किद वाई रस्त्यावर दर्जेदार वस्तू कमी किमतीत विकाव्या लागतात.
- त्यामुळे पाहिजे तसा नफा मिळत नाही. दिवसभरातून शेकडो स्वेटर विकले जातात. लहान मुलांच्या स्वेटरला अधिक मागणी आहे.”
- मोहम्मद हनीफ, स्वेटर विक्रेता (मालेगाव)
- “थंडी वाढल्याने उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. दोन पैसे मिळतील या अपेक्षेने राजस्थानमधून आम्ही कपडे विक्रीसाठी येत असतो.”
- रामजीभाई, उबदार कपडे विक्रेता (राजस्थान)
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space