
जाकडी नृत्यातून सुमधुर आवाजात प्रेक्षकांचे मन जिंकणारा उगवता तारा शाहीर सचिन पानगले.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-तालुक्यातील मौजे पांगरी कों डवाडीचे सुपुत्र शाहीर सचिन श्रीपत पानगले यांनी उमद्या वयातच आपल्या नावा सभोवती वलय निर्माण केले आहे. सचिन यांची सुरवात पांगरी कोंडवाडी जाकडी नृत्यातून झाली.
- त्यांनी अनेक ठिकाणी वाडीतील जाकडी नृत्य संचातून आपली कला सादर करत आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांची मन जिकंली आहेत.

- अनेक जेष्ठ, वरिष्ठ मंडळीची कौतुकाची थाप आणि मार्ग दर्शन त्यांना लाभले. गाव सोडून मुंबईला कामा निमित्त स्थलांतरीत झाल्यावर कला क्षेत्रातील अनेक दिग्गज-मात ब्बगार मंडळीं सोबत ओळख झाली.
- मुळातच सचिन यांना लहान पासून कलेची आवड होती त्यांना मिळालेले सहकारी मित्र, शाहीर प्रफुल्ल पुजारी यां च्या सारख्या असंख्य सहकाऱ्यांचे मार्गदर्शन, प्रेरणेने, त्यां च्या सोबतीने हळूहळू नाट्य क्षेत्रात पाय रोवला त्यांना सुर वातीला नाटकात छोट्या छोट्या भूमिका करायला मिळाल्या.
- त्यानंतर त्यांचे कौशल्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजां ची भूमिका करण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
- त्यांनी त्या भूमिकेचे सोने केलं गेल्या चार-पाच वर्ष सचिन पानगले यांचे गणपती उत्सत्वाचे औचित्य साधून दरवर्षी एक नवीन गाणे युट्यूबवर पाहायला मिळायचे.
- त्यात समाजातील अनेक विविध विषय निवडून गीतातून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न सातत्यांनी करत राहिले या वर्षी सचिन पानगले यांनी एक आगळीवेगळी संकल्प ना मनात आणून माय मराठी सक्ती – तुरा व्हिसिडी आप ल्या चाहत्यांसमोर आणली आहे.
- यात विशेष म्हणजे आपल्या गावचे ग्रामदैवत श्री.देव रव ळनाथांची महती गाणारे गीत श्रवणीय ठरले आहे. यातील सर्व गाणी कवी, गीतकार निलेश उजाळ यांनी लिहिली आहेत.
- त्या सर्व गाण्यांना सचिन पानगले यांनी स्वरसाज चढवला आहे. या व्हिसीडीतील सर्व गीते मनाला हर्ष देणारी आहेत.

- या गीतांच्या मधुर स्वरांनी श्रोत्यांवर मोहिनी घातली आहे. श्री सचिन पानगले यांच्यासारखे अनेक शाहीर शक्ती तुरा या लोककलेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.
- कोकणातील पारंपरिक कलगीतुरा कला जोपासत आहेत तीचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे कोंडवाडीतील सामाजिक कार्यकर्ते अक्षय दशरथ म्हादे यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











