नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 7711006625 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , विधू विनोद चोप्रांच्या मुलानं क्रिकेटचं मैदान मारलं; अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू – Global Times News

Global Times News

Latest Online Breaking News

विधू विनोद चोप्रांच्या मुलानं क्रिकेटचं मैदान मारलं; अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय क्रिकेटपटू

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
  • प्रतीनीधी : हर्षल ठाकरे :- भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा अग्नी चोप्रा क्रिकेटचं मैदान गाजवत आहे.
  • त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतकांचा धडाकाच लावला आहे. नुकतीच प्रथम श्रेणी क्रिकेटची कारकीर्द सुरू झालेल्या अग्नीने पहिल्या चार सामन्यातच मोठा इतिहास रचला.
  • अग्नी देव चोप्रा हा रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरमकडून खेळतो. त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्या चार सामन्यात शतक ठोकून इतिहास रचला.
  • अग्नी चोप्रा हा भारताचा एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिल्या चार साम न्यात चार शतके ठोकली आहेत.
  • अग्नी चोप्राने या वर्षीच्या रणजी ट्रॉफीमध्ये सिक्कीम विरूद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने आतापर्यंत सलग 4 शतकी खेळी केल्या आहेत.
  • अग्नी हा 25 वर्षाचा असून त्याने सलग चार शतके ठो कत भारतीय क्रिकेट वर्तुळात खळबळ उडवून दिली. अग्नी चोप्राने सिक्कीम, नागालँड, अरूणाचल प्रदेश आणि मेघालयविरूद्ध शतकी खेळी केली आहे.
  • सिक्कीम विरूद्ध पहिल्या सामन्यात अग्नी चोप्राने पहि ल्या डावात 166 आणि दुसऱ्या डावात 92 धावा केल्या होत्या.
  • तर नागालँडविरूद्ध त्याने 166 धावा आणि 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर अरूणाचल प्रदेशविरूद्ध अग्नीने पहिल्या डावात 114 धावांची शतकी खेळी केली.
  • त्यानंतर मेघालयविरूद्धच्या सामन्यात देखील त्याने मेघालयविरूद्ध पहिल्या डावात 105 तर दुसऱ्या डावात 101 धावांची शतकी खेळी केली.
  • अग्नीच्या कामगिरीवर आई खूष
  • विधू विनोद चोप्रांनी नुकतेच सुपरहिट चित्रपट 12 वी फेल दिग्दर्शित केला. अग्नी दव चोप्रा हा त्यांचा मुलगा आहे.
  • अग्नी देव चोप्रा हा देशांतर्गत क्रिकेट गाजवतोय. त्याची आई अनुपमा चोप्रा देखील प्रसिद्ध लेखिका, पत्रकार आणि चित्रपट समिक्षक आहे. त्या अग्नीच्या कामगिरी वर प्रतिक्रिया देताना
  • रणजी ट्रॉफी 2023 – 24 अग्नीसाठी स्वप्नवत
  • रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात आतापर्यंतच्या साम न्यात अग्नी चोप्रा हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
  • त्याने आतापर्यंतच्या 8 डावात 775 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही 96.28 इतकी आहे. त्याने चार सामन्यात 5 शतकी खेळी केल्या आहेत.
  • यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्या चा मान देखील अग्नी देव चोप्रालाच मिळाला आहे.
  • रणजी ट्रॉफीच्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर तन्मयचा नंबर लागतो. त्याने 4 डावात 594 धावा केल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space


मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा