माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी देशातील नागरिकांना आळशी समजत होत्या; पंतप्रधान नरेंद्र मोदी
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : संतोश मांडवकर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभाराच्या प्रस्तावावर सभा गृहात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रे ससह विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.
- काँग्रेसच्या मानसिकतेमुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेसने देशाच्या सामर्थ्यावर कधीही विश्वास ठेवला नाही.
- काँग्रेस देशातील नागरीकांबाबत कसा विचार करतात ते सांगितल्यानंतर काँग्रेसला माझा राग येतो.
- १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाचे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी जे सांगितले होते, ते पुन्हा वाचून दाखवतो, असं म्हणत त्यांनी नेहरूंवर टीका केली आहे.
- पुढे ते म्हणाले, ‘भारतात अधिक मेहनत करण्याची सव य नाही. आम्ही इतके काम नाही करत, जेवढे युरोप, जपान, रशिया, अमेरिका किंवा चीनमधील लोक करतात.
- हे समजू नका त्यांचा समाज चमत्काराने विकसित झा लेला नसून मेहनत आणि हुशारीच्या बळावर विकसित झाला आहे’, असं म्हणत नेहरु भारतीय नागरीकांना आळशी समजत होते.
- भारतीय कमी अक्कल असलेले आहेत, असे नेहरुंचे म्हणणे असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
- इंदिरा गांधी यांची विचारसरणी जवाहरलाल नेहरूं पेक्षा फारशी वेगळी नव्हती- PM मोदी
- इंदिरा गांधी यांची विचारसरणी जवाहरलाल नेहरूंपेक्षा फारशी वेगळी नव्हती, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
- दुर्दैवाने आमचे काम जेव्हा पुर्णत्वास जात असते, तेव्हा आम्ही आत्मसंतुष्ट होतो आणि जेव्हा आमच्यासमोर संकट येते, तेव्हा नाउमेद होऊन जातो.
- कधी कधी तर असं वाटतं की, संपूर्ण राष्ट्राने पराजय भावना स्वीकारली आहे.
- आजच्या काँग्रेसकडे आणि लोकांकडे पाहिल्यावर असे वाटते, इंदिराजींनी भलेही देशातील नागरीकांचे आकलन चुकीचे असेल.
- पण काँग्रेसचे अतिशय अचूक असे आकलन त्यांनी केले होते, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
- ‘काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लॉन्च केल्यामुळे दुकानाला कुलूप लावण्याची वेळ’
- काँग्रसमध्ये वारंवारं एकच प्रोडक्ट लाँन्च केल्यामुळे त्यांच्या दुकानाला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.
- गेल्या १० वर्षांमध्ये काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनता आलं असतं, असंही मोदी पुढे म्हणाले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space