कांदा निर्यातबंदीने शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
- प्रतीनीधी : राजाराम खांगड :- केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने दहा दिवसांपूर्वी कांदा निर्यातबंदी कायम राहणार असल्याचे अध्यादेश काढल्याने जिल्ह्यातील समस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
- त्यामुळे शेतकऱ्यांसमोर ऐन दुष्काळात मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. मुला-मुलींचे लग्न व कुटुंबाच्या उदरनिर्वा हाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- ३१ मार्चला कांदा निर्यातबंदी उठल्यावर तरी कांद्याचे दर वाढतील, अशी अपेक्षा होती.
- मात्र, तसे झाले नाही. उलट केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी कायम ठेवून निवडणुकीच्या तोंडावर राज्यासह देशातील शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे.
- या निर्णयामुळे उन्हाळी कांद्याला फटका बसणार आहे. ज्या कांद्याला प्रतिकिलो १२ ते १३ रुपये उत्पादन खर्च आहे, असा कांदा ७ ते ९ रुपये किलोप्रमाणे विकावा लागत असेल तर शेतकऱ्यांनी कसे जगावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्याचे साधन कांदा पीक आहे. त्याच कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. दर कमालीचे खाली आले आहेत.
- त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सर्व बाजूंनी अडचणीत साप डला आहे. चा राजा अद्याप सामान्यांच्या आवाक्याबाहेर! अवकाळीमुळे आंब्याची आवक घटली; दर चढेच राहणार
- शेतकऱ्यांमध्ये संताप
- यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशात उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले.
- त्यात शेतकऱ्यांनी कसेबसे कांदा पिक जगवले. मात्र, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतल्याने कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे.
- केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय. “केंद्र सरकारने ८ डिसेंबर रोजी कांद्यावर पूर्णपणे निर्यातबंदी केल्यामुळे देशांतर्गत कांद्याचे दर कोसळले होते.
- त्यानंतर निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलने केली. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. लोकसभा निवडणु कीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकार ने हा निर्णय घेतला आहे.
- लवकरात लवकर निर्यातबंदी मागे घ्यावी, अन्यथा त्याचे परिणाम येणाऱ्या निवडणुकीत भोगावे लागतील.”
- – भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space